रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दीपिका पदुकोण गेली होती डिप्रेशनमध्ये

रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्या रोमान्सच्या चर्चा एकेकाळी इंडस्ट्रीत रंगल्या होत्या.
Deepika Padukone and Ranbir Kapoor
Deepika Padukone and Ranbir KapoorDainik Gomanntak
Published on
Updated on

रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्या रोमान्सच्या चर्चा एकेकाळी इंडस्ट्रीत रंगल्या होत्या. दोघे अनेकदा एकत्र दिसले होते आणि मोठ्या पडद्याप्रमाणे ही जोडी खऱ्या आयुष्यातही हिट ठरली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'बचना ए हसीनो' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यातील जवळीक वाढली होती. रणबीर (Deepika Padukone) आणि दीपिकाच्या (Ranbir Kapoor) चाहत्यांसह त्यांच्या आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांनाही आता ही जोडी लवकरच लग्न करून सेटल होईल असे वाटू लागले. मात्र, त्यानंतर रणबीर आणि दीपिकाच्या ब्रेकअपच्या बातम्या आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. (Deepika Padukone and Ranbir Kapoor Relationship News)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका पदुकोणसोबत गंभीर रिलेशनशिपमध्ये असूनही रणबीर तिची फसवणूक करत होता. दीपिकानेच रणबीरला अन्य एका अभिनेत्रीसोबत रंगेहात पकडल्याचे सांगितले जाते. नात्यातील या असंतोषामुळे दीपिका आणि रणबीरचे ब्रेकअप झाले होते. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, रणबीरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दीपिका डिप्रेशनमध्ये गेली होती. याचा उल्लेखही अभिनेत्रीने अनेक प्रसंगी केला आहे. दीपिकाच्या मते, तो काळ तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता.

Deepika Padukone and Ranbir Kapoor
पावनखिंड! मावळ्यांच्या पराक्रम आणि बलिदानाची शौर्यगाथा

मात्र, स्वतः रणबीर कपूरने दीपिका पदुकोणला नैराश्यातून सावरण्यासाठी खूप मदत केली. दीपिकाने एका मुलाखतीत कबूल केले होते की, नाते संपुष्टात आल्यानंतरही रणबीर कपूरने एक मित्र म्हणून तिला नैराश्याशी लढण्यासाठी खूप मदत केली होती. जर वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर दीपिका 'पठाण' आणि 'फायटर' इत्यादी चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर रणबीर कपूरच्या आगामी चित्रपटांमध्ये 'ब्रह्मास्त्र'चा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com