पावनखिंड! मावळ्यांच्या पराक्रम आणि बलिदानाची शौर्यगाथा

आजही या बाजी प्रभू देशपांडे नावाच्या वाघाच्या पराक्रमाची आठवण पन्हाळगडावर गेल्यावर होते.
Pawankhind Marathi Movie Review
Pawankhind Marathi Movie ReviewDainik Gomantak
Published on
Updated on

Pawankhind Movie Review: एखादी चांगली गोष्ट लोकांपर्यंच पोहचायची असेल तर त्याला वेळ लागत नाही.कारण त्या गोष्टीकडे लोकंही आकर्षित होत असतात. तसाच एक चांगला सिनेमा लोकांपर्यंत पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे अल्लू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कशी चांगली कामगिरी केली हे आपण जाणून आहोत. पुष्पाचे डायलॉग आणि ट्रेंड अजूनही सिनेरसिकांच्या ओठांवर कायम आहे. अलिकडे प्रादेशिक चित्रपटांचा आलेख झपाट्याने वाढत आहे. दक्षिण भारतीय चित्रपटांपाठोपाठ मराठी चित्रपटही आपली ताकद सिनेजगात दाखवत आहेत. नुकताच प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट पावनखिंड बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे.सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. हा चित्रपट शिवजयंतीच्या एक दिवस आधी म्हणजे 18 फेब्रुवारीला रिलीज झाला.

पावनखिंड (Pawankhind) ही एक ऐतिहासिक घटना आहे.ज्याचे वर्णन या चित्रपटात करण्यात आले आहे, अनेक युवा शुर सैनिकांचा पराक्रम या चित्रपटात दाखविण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. मराठा योद्धा बाजी प्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. ज्यात पावनखिंडीत झालेल्या लढाईचे चित्र दाखविण्यात आले आहे. मुख्य स्टारकास्टमध्ये चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी यांसारख्या स्टार्सचा समावेश आहे. या चित्रपटातील सर्वच मराठी कलाकारांचे प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे.

काय आहे चित्रपटाची कथा? (Story of Pawankhind Movie)

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मराठा सैन्याने पन्हाळगड ताब्यात घेतला होता. शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी सिद्धी जोहरने किल्ल्याभोवती सहा महिने पहारा उभारला होता. त्यामुळे मराठा सैन्य आणि शिवाजी महाराज किल्ल्यातच अडकले होते. मग योद्धा बाजी प्रभू देशपांडे आणि बांदल शुर तिथून बाहेर निघण्याची रणनीती बनवतात. पन्हाळगडावरून बाहेर निघण्याचा मार्ग भयावह अत्यंत भयावह होता. आणि त्यात सिद्दी जोहरचे सैन्य राक्षसासारखे महाराजांचा पाठलाग करत होते. तेव्हा सैन्याच्या रूपात मृत्यू पुढे उभा असताना महाराजांच्या आणि मृत्यूच्या मध्ये बांदल शुर म्हणजे बाजी प्रभू देशपांडे आणि त्यांचे सैन्य उभे होते. आणि याच पावनखिंडीत मराठा शुर विरांनी चार प्रहर लढा दिला. रात्रभर पायी चालून दमलेले बांदल, थकलेले शरिर आणि मोजके सैन्य घेवून रयतेच्या राजाला सुखरूप गडावर पोहचविण्यासाठी लढा देत होते. बाजी हे एका आक्रमक सिहांसारखे शत्रूवर तुटून पडले होते. एक एक मराठा शंभर सैन्यावर भारी पडत होता. त्या पावनखिंडीतील कासारी नदिच्या उगमस्थानी रक्ताची नदी वाहत होती. या शुर मराठा सैन्याच्या बलिदानाची आणि पराक्रमाची गाथा म्हणजे पावनखिंड.

शौर्याची आणि पराक्रमाची मिसाल

बाजी प्रभू देशपांडे आणि त्यांच्या 600 बांदल सैन्याने सिद्धी मसूद आणि आदिलशाही सल्तनतच्या सैनिकांचा कसा पराभव केला याचे चित्र प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर या चित्रपटातून उभे केले आहे. पावखिंडीचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. महाराजांचा खास गुप्तहेर बहिजी नाईक यांनी एक युक्ती केली. हुबेहुब महाराजांसारखा दिसणाऱ्या शिवा काशिदला या युक्तीचा नायक बनवला. याच शिवा काशिदने महाराजांसाठी कसा त्याग केला, कसं त्याने देवाच्या मरणाला आलिंगन दिलं हा सगळा प्रसंग अंगावर शहारे आणण्यासारखं आहे. त्याच्या या बलिदानामुळे आणि गुप्तहेर बहिजी नाईक यांच्या युक्तीमुळे 600 बांदल सैन्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळगड किल्ल्यावरून यशस्वीपणे हुसकावून लावले. बाजी प्रभू देखपांडे यांनी आपले राजे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी प्राण दिले. त्यांच्या शौर्याची आणि पराक्रमाची मिसाल आजही दिली जाते. आजही या वाघाच्या पराक्रमाची आठवण पन्हाळगडावर गेल्यावर होते.

बॉक्स ऑफिसवर पावनखिंड

पावनखिंड 18 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अवघ्या ३ दिवसांत या चित्रपटाने कमाल केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1.15 कोटींची कमाई केली होती. शनिवारी या चित्रपटाच्या कमाईत 80 टक्क्यांनी वाढ झाली असून 2.05 कोटींची कमाई केली आहे. रविवारी या चित्रपटाने 3 कोटींची कमाई केली. ओपनिंग वीकेंडला चित्रपटाचे कलेक्शन 6 कोटींचे झाले आहे.

Pawankhind Marathi Movie Review
कहाणी गोमंतकीय मुक्त झालेल्या गोवापुरीची

शिवसैनिकांची गाथा

पहिल्या दिवसापासून हा चित्रपट मुंबईतील बी आणि सी सेंटरमध्ये हाऊसफुल्ल होता. एकट्या महाराष्ट्रात या चित्रपटाचे 1990 शो झाले आहेत. देशप्रेमाने, स्वराज्यप्रेमाने ओथंबलेला हा चित्रपट तुम्हाला भावूकही करतो. आतुरतेने वाट पाहणाऱ्या आई, पत्नी आणि राजमाता जिजाऊंच्या भावनिक गुंता देखिल या चित्रपटात दाखवला आहे.स्वराज्यासाठी लढा देणाऱ्या विश्वासू, पराक्रमी, शौर्यवान,धेर्यशील, धाडसी, त्यागी, आणि महाराजांसाठी मृत्यूलाही कवटाळणाऱ्या या शिवसैनिकांची ही गाथा आहे. जी येणाऱ्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणा देणारी आहे...

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com