Pathan Vs Tiger
Pathan Vs TigerDainik Gomantak

Pathan Vs Tigerमध्ये आता सलमान -शाहरुखसोबत दिपीका - कतरीनाही? या दिवशी होणार शूट सुरू

बहुचर्चित पठाण वर्सेस टायगर हा चित्रपट आता लवकरच येणार असुन यात आता कतरिना आणि दिपीकाची एन्ट्री झाली आहे.

Pathan Vs Tiger: शाहरुख खानचा पठाण आणि सलमान खानचा टायगर एकत्र आणण्याची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. या चित्रपटात शाहरुख खान-सलमान खानसोबतच दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफचीही एन्ट्री होणार आहे. 

आता या चित्रपटाच्या शूटिंगबाबत एक मोठे अपडेट आले आहे, त्यानुसार यशराज फिल्म्सचा पठाण वर्सेस टायगर नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यापासून म्हणजेच जानेवारी २०२४ पासून सुरू होणार आहे.

सलमान - शाहरुखची जुगलबंदी

ई-टाइम्सच्या ताज्या अहवालानुसार, शाहरुख खानचा पठाण आणि सलमान खानच्या टायगर फ्रँचायझीचा एक अप्रतिम सहयोग पठाण विरुद्ध टायगरमध्ये दिसणार आहे.

या दोन्ही चित्रपटांच्या नायिका म्हणजेच दीपिका पदुकोण-कतरिना कैफही एकत्र दिसणार आहेत. 

रिपोर्टनुसार, दीपिका आणि कतरिना दोघीही 24 जानेवारी 2024 पासून शाहरुख खान-सलमान खानसोबत चित्रपटाची शूटिंग करणार आहेत.

तसेच दीपिकाने पठाण आणि कतरिनाने टायगरमध्ये जी भूमिका साकारली होती, त्याच भूमिकेत ती दिसणार असल्याचे बोलले जात आहे. 

पुन्हा सिद्धार्थ आनंद

पठाणचे यश आणि टायगर फ्रँचायझीची कमाई पाहता यशराज फिल्म्सने पठाण वर्सेस टायगर रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.

YRFने हा चित्रपट बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडलेली नाहीये, स्पाय युनिव्हर्सचा जबरदस्त अनुभव या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याचं बोललं जात आहे. 

रिपोर्ट्सनुसार, पठाण वर्सेस टायगर या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सिद्धार्थ आनंदकडे सोपवण्यात आली आहे. पठाणचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद पुन्हा एकदा एक सुपरहिट चित्रपट देण्यासाठी तयार आहे.

काही शॉट्स रिलीज

मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटासाठी दिग्दर्शकाने पठाणचे काही शॉट्सही रिलीज केले होते, ज्यामध्ये शाहरुख खान आणि सलमान पुन्हा एकत्र दिसले होते.

पठाण वर्सेस टिगची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही, मात्र शूटिंगपूर्वीच लोकांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता आहे.

Pathan Vs Tiger
Salaman Khan - Vicky Kaushal : हे बरं नव्हे ! सलमानचा विकी कौशलला रागाने पाहिलं, वरती बॉडीगार्डने दिला धक्का....व्हिडीओ बघाच

टायगरचा व्हायरल व्हिडीओ आणि विकी कौशल

सध्या सलमानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, सलमान त्याच्या अंगरक्षकांसह प्रवेश करताना विकी कौशल काही अंतरावर उभा असलेला दिसत आहे. जसजसा सलमान हळू हळू जवळ येत आहे तसतसा विकी सलमानच्या दिशेने हात पुढे करताना त्याला अभिवादन करताना दिसतो. 

तथापि, एक सुरक्षा कर्मचारी विकीला सुपरस्टारपासून दूर ढकलतो, कारण सलमान त्याच्याकडे हात पुढे करत नाही आणि फक्त एक नजर टाकतो आणि निघून जातो. विकीच्या चेहऱ्यावरचे हावभाव स्पष्ट दिसत आहेत. त्यांनी दुसऱ्यांदा हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न केला, पण सलमानने त्यांना ओळखले नाही आणि तेथून निघून गेले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com