सध्या बॉक्स ऑफिसवर तगडी फाईट सुरू अजय देवगणचा भोला,सुपरस्टार नानीचा दसरा आणि आता आदित्य रॉय कपूरचा गुमराह यांच्यात तगडी फाईट सुरू आहे. यापूर्वी बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. यामध्ये 'भोला' आणि 'दसरा' तसेच नुकत्याच रिलीज झालेल्या 'गुमराह'चा समावेश आहे.
भोला आणि दसरा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत असताना, आदित्य रॉय कपूर स्टारर 'गुमराह' प्रेक्षकांना कसे भुरळ घालण्यात यशस्वी होतो हे पाहणे मनोरंजक असेल. चला जाणून घेऊया या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल.
अजय देवगण दिग्दर्शित 'भोला'ला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. याने आतापर्यंत तिकीट खिडकीवर बऱ्यापैकी प्रेक्षक गोळा केले आहेत. 'भोला'ची पहिल्या तीन दिवसांची कमाई काही खास नव्हती. मात्र, त्यानंतर उत्पन्नात वाढ झाली आहे.
या चित्रपटाने 9 दिवसात 63.28 कोटींचे कलेक्शन केले. आणि 10व्या दिवशी चित्रपटाची कमाई 4.25 कोटी झाली आहे. ही कमाई चांगली असली तरी दसरा या चित्रपटाला टक्कर देण्यात चित्रपट तेवढा यशस्वी झाला नाही.
साउथ सुपरस्टार नवीन बाबू उर्फ नानीचा पहिला संपूर्ण भारतातील चित्रपट 'दसरा' देखील 30 मार्च रोजी प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कल्ला करत आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी 23.02 कोटी, दुसऱ्या दिवशी 9.75 कोटी, तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी 13 कोटी आणि पाचव्या दिवशी 4 कोटींची कमाई केली आहे.
9व्या दिवसापर्यंत 'दसरा'ने 1.7 कोटींचा गल्ला जमवला आहे. त्याचवेळी, सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने 10 व्या दिवशी 2.50 कोटींची कमाई केली आहे. या संदर्भात चित्रपटाचे एकूण कलेक्शन 73.30 कोटी झाले आहे.
बॉलिवूडमध्ये साऊथ चित्रपटांचे रिमेक बनवणे ही काही नवीन गोष्ट नाही. या यादीत आदित्य रॉय कपूरचा चित्रपट ' गुमराह ' देखील सामील झाला आहे, जो तामिळ चित्रपट 'थडम'चा रिमेक आहे. हा चित्रपट ७ एप्रिल रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
पहिल्या दिवशी चित्रपटाचे एकूण कलेक्शन 1.10 कोटी इतके होते. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 4.50 कोटींची कमाई केली. आता पुढच्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर नेमकं काय होणार हे पाहणं मोठं रंजक असणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.