Cyrus Broacha Big Boss : या कारणांमुळे सायरस ब्रोचा बिग बॉसमधुन बाहेर पडला

आठवड्यात एलिमिनेशन नसतानाही सायरस ब्रोचाने सलमान त्याला घराबाहेर जाऊ देण्याची विनंती केली.
Cyrus Broacha Big Boss
Cyrus Broacha Big BossDainik Gomantak
Published on
Updated on

सलमान खान होस्ट करत असलेल्या Big Boss OTT 2 प्लॅटफॉर्मची सध्या सोशल मिडीयावर जोरदार चर्चा होत आहे. या आठवड्यात 'बिग बॉस OTT 2' मधून कोणतेही एलिमिनेशन होणार नव्हते. होस्ट सलमान खानने 'नो इव्हिकशन'ची घोषणा केली होती. मात्र अचानक सायरस ब्रोचा यांना घराबाहेर हाकलून देण्यात आले. सायरस ब्रोचा लाइव्ह फीडमध्ये कोठेही दिसला नाही. 

सायरस ब्रोचा या शोमध्ये फारसे काम करत नसेल, परंतु त्याच्या अचानक बाहेर पडल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. सायरस ब्रोचा यांनी अचानक 'बिग बॉस ओटीटी 2' का सोडला असा प्रश्नही लोक विचारत आहेत?

सायरस सलमानला म्हणाला

बिग बॉस ओटीटी 2 पूर्वी फक्त चार आठवड्यांसाठी होता, परंतु निर्मात्यांनी त्यास आणखी दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली. जेव्हा सलमानने ही बातमी घरातील सदस्यांना दिली तेव्हा सायरस ब्रोचाला आनंद झाला नाही. त्याऐवजी, त्याने निर्मात्यांना आणि सलमान खानला 'बिग बॉस OTT 2' सोडण्याची परवानगी देण्याची विनंती केली. याचे कारणही सायरसने सांगितले.

सायरसने सलमानला हात जोडून माफी मागितली

सायरस ब्रोचाने सलमानला हात जोडून सांगितले की, त्याला झोपायला आणि खाण्यात त्रास होत आहे. तो रात्री फक्त 3 तास झोपतो आणि त्याला खूप सुस्त वाटत आहे. सायरस 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडण्याची विनंती करत होता. सायरस म्हणाला होता की तो भावनिकदृष्ट्या खचून गेला आहे आणि शोमध्ये काहीही योगदान देऊ शकत नाही. 

जेव्हा सायरसने सांगितले की आपण शारीरिकदृष्ट्या थकलो आहोत आणि काही वेळाने सलमान काय बोलतो ते ऐकूही शकत नाही, असे सांगताच सर्वांनाच धक्का बसला. आता सायरस अचानक शोमधून बाहेर पडला आहे.

Cyrus Broacha Big Boss
Manny Coto Passes Away : जगप्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक मॅनी कोटो यांचं निधन

सायरसने दिली कारणं

सायरस ब्रोचाने एक्झिट घेण्यामागे अनेक कारणे दिली होती, पण सलमान आणि पूजा भट्ट यांनी मिळून त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. अशा स्थितीत कदाचित त्याची खात्री पटेल आणि तो शोमध्ये थांबेल असे वाटत होते. पण आता सायरसच्या टीमकडूनही उत्तर आले आहे. सायरस ब्रोचा 'बिग बॉस OTT 2' मधून बाहेर पडण्याचे कारण समोर आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com