Jai Bhim: अभिनेता सुरिया अन् निर्मात्यांविरुद्ध FIR नोंदवण्याचे न्यायालयाने दिले आदेश

वन्नियार समाजाची चुकीच्या पध्दतीने मांडणी केल्याबद्दल न्यायालयाने अभिनेता सुरिया, त्याची पत्नी ज्योतिका आणि दिग्दर्शक टीजे गन्नावेल (TJ Gunnavel) यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.
Suriya
Suriya Dainik Gomantak
Published on
Updated on

दाक्षिणात्य सुपरस्टार सुरिया दिग्दर्शित 'जय भीम' चित्रपटात वन्नियार समाजाची चुकीच्या पध्दतीने मांडणी केल्याबद्दल न्यायालयाने अभिनेता सुरिया, त्याची पत्नी ज्योतिका आणि दिग्दर्शक टीजे गन्नावेल यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. 'जय भीम' च्या निर्मात्यांनी आपल्या समाजाची चुकीच्या पध्दतीने मांडणी केली, असा आरोप वन्नियार संगमची मूळ संस्था पट्टाली मक्कल काची (PMK) या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केल्यानंतर न्यायालयाचा आदेश आला आहे. (Court orders FIR against actor Suriya and director TJ Gannavel for misrepresenting Vaniyar Samaj in Jai Bhim movie)

'जय भीम'च्या निर्मात्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

वन्नियार संगमचे प्रदेशाध्यक्ष टी अरुलमोझी यांनी 'जय भीम' (Jai Bhim) च्या निर्मात्यांविरोधात चिदंबरम कोर्टात खटला दाखल केला होता. या तक्रारीत प्रोडक्शन बॅनर 2D एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड, सुर्या, त्यांची पत्नी ज्योतिका आणि प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओची नावे आहेत. 'जय भीम' अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झाला होता.

Suriya
Jai Bhim: सूर्याच्या अडचणीत वाढ, हल्ल्याच्या धमकीनंतर घराबाहेर पोलिस बंदोबस्त

वन्नियार संगम यांच्या मते, 'जय भीम' कोणत्याही कौतुकास पात्र नाही. वन्नियार संगमच्या सदस्यांनी सांगितले की, विशिष्ट समुदायाची बदनामी करण्यासाठी चित्रपटात (Movies) काही सीन्स जाणूनबुजून टाकण्यात आले आहेत. टी अरुलमोझी यांच्या मते, 'जय भीम'चा उद्देश वन्नियार आणि इतर सदस्यांमध्ये जातीय तेढ निर्माण करणे हा होता. वन्नियार संगमची तक्रार फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 199(6) 200 सोबत नोंदवण्यात आली. भारतीय दंड संहिता, 1860 च्या कलम 153, 153A(1), 499, 500, 503 आणि 504 अंतर्गत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती.

याशिवाय, 'जय भीम'मध्ये एका सीन आणि नावावरुन संपूर्ण वाद निर्माण झाला होता. सीनबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटात अग्नि कुंडम असलेले कॅलेंडर दिसले आणि नावाबद्दल बोलायचे झाले तर, पीडितेवर अत्याचार करणारा पोलीस उपनिरीक्षक गुरुमूर्ती होता. गुरुमूर्ती हे वन्नियार समाजाचे लोकप्रिय नेते होते. अरुलमोझीच्या म्हणण्यानुसार, त्या उपनिरीक्षकाचे खरे नाव अँथोनीसामी होते. अरुलमोझी म्हणाले की, उपनिरीक्षक वन्नियार समुदायातील नाही. अरुलमोझी यांच्या मते, समुदायांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न होता. 'जय भीम' च्या आक्रमक प्रतिसादानंतर प्रश्नातील सीन्स वगळण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com