इंटरनेटचे (Internet) जग असे आहे की कधी आणि कसे अचानक प्रसिद्धी मिळवेल, कोणालाही सांगता येत नाही. इंटरनेटच्या जगात कोणत्याही व्यक्तीचे टैलेंट कधीना कधी जगासमोर येतचं. श्रीलंकन गायिका योहानीच्या बाबतीतही असेच घडले जेव्हा तिच्या 'मणिके मगे हिते' (Manike Mage Hithe) हे गाणे यूट्यूबवर अचानक ट्रेंड करायला लागले.
* यूट्यूबवर झाले व्हायरल
काही महिन्यांपूर्वी श्रीलंकन गायिका योहानाचे कव्हर सॉन्ग 'मानिके मगे हिते' अचानक यूट्यूबवर ट्रेंड होऊ लागले. या गाण्याचे संगीत आणि बीट सर्वानाच भुरळ पाडणारे होते. ज्या लोकांनी हे गाणे ऐकले ते स्वत:ला शेअर करण्यापासून रोखू शकले नाही. यूट्यूबवर हे गाण प्रसिद्ध झाल्यावर इन्स्टाग्रामवरही व्हायरल व्हायला सुरुवात झाली. या गाण्यावर अनेक कलाकारांनी रील बनवण्यास सुरुवात केली. हे गाण या वर्षातील सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक मानले गेले आहे.
श्रीलंकन गायिका योहानीचे हे गाणं आता हिंदीत तयार केले जाणार आहे. ती स्वत: या गाण्याला आवाज देणार आहे. बॉलीवुडच्या जगातला हा तिचा पहिला प्रोजेक्ट असणार आहे. हे गाइंद्र कुमार दिग्दर्शित चित्रपट 'थँक गॉड' साठी रेकॉर्ड केल जाईल. हे चित्रपटाचा एक भाग असेल. या चित्रपटामध्ये अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा आणि राकुल प्रीत सिंह मुख्य भूमीकेमध्ये आहेत. या गाण्याला तनिष्क बागची संगीत देणार आहे.
* योहानीला श्रीलंकेची रॅप राजकुमारी म्हटले जाते
योहानी कोलंबोची रहिवाशी आहे.ती एक गायक, गीतकार,रॅपर आणि संगीत निर्माती आहे. ती टिक टॉकवरील प्रसिद्ध सेलिब्रिटी आहे. तिला श्रीलंकेची 'रॅप प्रिन्सेस' म्हणून ओळखले जाते. योहानीच्या 'मानिके मगे हिते' या गाण्याला भारतात यूट्यूबवर 160 दशक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.