Bollywood Actress: वयाच्या चाळीशीत 'आई' झालेल्या बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्री

बॉलिवूडमधील अनेक कलाकार असे आहेत जे उशीरा आई-वडील झाले आहेत.
Bollywood Actress
Bollywood ActressDainik gomantak

Celebrity Moms Who Embraced Motherhood In Their 40s: बॉलिवूडचे अभिनेता, अभिनेत्री यांनी उशीरा लग्न करायची सवय आहे. लग्नपेक्षा चित्रपटातील करिअरला महत्व देणार कलाकारांचे लग्न उशीरा झाल्याने त्यांना मुलं देखील उशीरा होतात. बॉलिवूड असो किंवा हॉलिवूड सर्व ठिकाणी हा ट्रेंड आहे. सध्या हा ट्रेंड युवा वर्गात देखील प्रचलित झाला आहे. पण, बॉलिवूडमधील अनेक कलाकार असे आहेत जे उशीरा आई-वडील झाले आहेत. चला तर मग जाणून घेऊया अशा कोण खासकरून अभिनेत्री आहेत ज्या वयाच्या चाळीशीत 'आई' झाल्या.

करीना कपूर खान

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूरने 2012 मध्ये प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न केले. करीना तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान या दोन मुलांची आई आहे. करीना 40 वर्षांची होती त्यावेळी तिच्या दुसऱ्या मुलाचा जन्म झाला. करीना हे पहिले लग्न असले तरी सैफचे मात्र हे दुसरे लग्न असून, पहिली पत्नी अमृता सिंगपासून देखील सैफला दोन मुले आहेत. त्यातील सारा अली खान ही सध्या प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Bollywood Actress
Mopa Airport: मोपावर पहिल्या लँडिंगचा मान कुणाला, लवकरच 'या' खास व्यक्तीचे उतरणार विमान

शिल्पा शेट्टी कुंद्रा

शिल्पा शेट्टीचे लग्न उद्योगपती राज कुंद्राशी झाले आहे. 2012 मध्ये कुंद्रा दाम्पत्याला पहिले आपत्य झाले यावेळी शिल्पाचे वय 37 वर्ष होते. त्यानंतर, 2020 मध्ये तिला दुसरे आपत्य झाले. शिल्पा 45 वर्षांची होती त्यावेळी तिने सरोगसी केली.

नेहा धुपिया

नेहा धुपियाने तिचा बॉयफ्रेन्ड अंगद बेदी याच्याशी लग्न केले. नेहा 37 वर्षांची असताना तिला पहिले मुलं झाले, ती 41 वर्षांची असताना दुसरे आपत्य झाले. नेहा दोन मुलांची आई आहे पण, अजून एक आपत्य हवं असल्याचा खुलासा तिने एका मुलाखतीत केला होता.

Bollywood Actress
Pak Army Video: पहिल्याच LOC दौऱ्यात पाकच्या नव्या लष्करप्रमुखांची भारताला धमकी, पाहा काय म्हणाले

अमृता राव

अभिनेत्री अमृता रावने तिचा प्रियकर, आरजे अनमोल याच्यांशी लग्न केले. नोव्हेंबर 2020 मध्ये वयाच्या चाळीशीत असताना अमृताला पहिले मुलं झाले. अमृता आणि अनमोल यांनी आपल्या मुलाचे नाव वीर ठेवले आहे.

प्रिती झिंटा

बॉलीवूड अभिनेत्री, प्रीती झिंटाने जीन गुडइनफ याच्याशी विवाह केला. 46 वर्षांची असलेल्या प्रीती झिंटाला दोन जुळी मुलं आहेत. तिने सरोगसीद्वारे मातृत्व स्वीकारले आहे.

फराह खान, मंदिरा बेदी, किश्वर मर्चंट, एकता कपूर

याशिवाय फराह खान, मंदिरा बेदी, किश्वर मर्चंट, एकता कपूर या देखील वयाच्या चाळीशीत आई झाल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com