Brahmastra Trailer: रणबीर-आलियाच्या रोमान्ससह ट्रेलरमध्ये अ‍ॅक्शनचा तडका

आज ब्रह्मास्त्रची एक छोटीशी झलक चाहत्यांना पाहायला मिळाली.
Brahmastra Trailer
Brahmastra TrailerTwitter
Published on
Updated on

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत होते. ही प्रतीक्षा आता संपणार आहे. ब्रह्मास्त्र या चित्रपटात दोघेही एकत्र दिसणार आहेत. आज या चित्रपटाची एक छोटीशी झलक चाहत्यांना पाहायला मिळाली. होय, ब्रह्मास्त्रचा (Brahmastra) ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये रणबीर आणि आलिया एका वाईट शक्तींशी लढताना दिसत आहेत. (Brahmastra Trailer out)

Brahmastra Trailer
जुबिन नौटियालची सर्वोत्कृष्ट गाणी जी तुमच्या प्लेलिस्टमध्ये हवीच

ब्रह्मास्त्र पार्ट वन शिवाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात रणबीर आणि आलियासोबत अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहेत. आलिया भट्टने सोशल मीडियावर ब्रह्मास्त्रचा ट्रेलर शेअर केला आहे. 'आमच्या हृदयाचा एक भाग - ब्रह्मास्त्र. 9 सप्टेंबरला भेटू.' असे कप्शन देत ट्रेलर शेअर केला आहे.

Brahmastra Trailer
Starkids Debut: सुहाना खानसह 'हे' 5 स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण

ब्रह्मास्त्राची कथा शिवा (रणबीर कपूर) नावाच्या व्यक्तीभोवती फिरत असल्याचे दिसते. ज्याच्यात एक अलौकिक शक्ती आहेत ज्याबद्दल त्याला स्वतःला माहिती नाही. शिव आणि ईशा (आलिया भट्ट) च्या प्रेमकथेमध्ये दरम्यान त्याला त्याच्या शक्तींबद्दल माहिती मिळते. ज्याद्वारे ब्रह्मास्त्राचा उद्धार होऊ शकतो. अमिताभ बच्चन आणि नागार्जुन या विश्वाचे रक्षण करताना दिसले, तर मौनी रॉय नकारात्मक भूमिकेत दिसली जी ब्रह्मास्त्राला काबिज करण्याचा मार्गावर आहे.

अयान मुखर्जीच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ब्रह्मास्त्र पार्ट वन शिवा हा या चित्रपटाचा पहिला भाग आहे. हा चित्रपट तीन भागात येणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत असून त्यानंतर आणखी दोन भाग येणार आहेत. हा चित्रपट 9 वर्षांपासून पाइपलाइनमध्ये होता. इतक्या वर्षांनंतर अखेर हा चित्रपट रसिकांना पाहायला मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com