जुबिन नौटियालची सर्वोत्कृष्ट गाणी जी तुमच्या प्लेलिस्टमध्ये हवीच

Jubin Nautiyal Famous Songs: झुबिनने गायलेली ही सर्वोत्कृष्ट गाणी
Jubin Nautiyal Birthday Special
Jubin Nautiyal Birthday SpecialDainik Gomantak

आपल्या गाण्यांनी सर्वांची मने जिंकणाऱ्या जुबिन नौटियालचा आज वाढदिवस आहे. लहानपणापासूनच संगीताची आवड असलेल्या जुबिनच्या संगीत कारकिर्दीचा प्रवास इतका सोपा नव्हता. जेव्हा जुबिन नौटियाल (Jubin Nautiyal) पहिल्यांदा एका मोठ्या शोचा भाग बनला तेव्हा तो खूप निराश झाला होता. आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात, झुबिन नौटियालने एक्स फॅक्टर या रिअॅलिटी शोमध्ये ऑडिशन दिली, ज्यामध्ये तो टॉप 20 मधून बाहेर पडला, परंतु या त्याने आपल्या मधुर आवाजाने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. (Jubin Nautiyal Best Songs News)

यानंतर त्याला 'सोनाली केबल' चित्रपटातील (Movie) 'एक मुलाकात' हे गाण ऑफर करण्यात आले. जे सुपर-डुपर हिट ठरले. त्यानंतर त्याने हळूहळू इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले. सोनाली केबलनंतर 'शौकीन' चित्रपटात 'मेहरबानी' हे गाण गायले आणि हे गाणेही सुपर-डुपर हिट ठरले. एकामागून एक दोन यशानंतर झुबिनने बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपला ठसा उमटवला आहे.

तुझे कितना चाहते और हम (कबीर सिंग चित्रपट)

तुम ही आना (मरजावान)

किन्ना सोना (मरजावान)

लो सफर शुरू हो गया (बागी २)

गजब का है दिन (दिल जंगली)

कुछ तो बता जिंदगी (बजरंगी भाईजान)

हमनवा मेरे

Jubin Nautiyal Birthday Special
Vat Purnima Vrat 2022: वट पौर्णिमेच्या व्रताचे नियम माहिती हवेच ?

झुबिनने गायलेली ही काही गाणी आहेत ज्यानी अनेकांची मनं जिंकली आहे. जुबिन नौटियालचे प्रत्येक गाणं नवीन रेकॉर्ड बनवते. पण 2021 सालाबद्दल बोलायचे झाले तर 2021 मध्ये जुबिन नौटियालचे 'लूट गये' गाण' हे यूट्यूबवर (Youtube) सर्वाधिक पाहिले गेले. या गाण्याला यूट्यूबवर 1.07 अब्ज व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणं 17 फेब्रुवारी 2021 रोजी रिलीज झाले आणि बघता बघता ते प्रेक्षकांची पहिली पसंती बनले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com