'सुशांतचं 'Brahmastra' बॉलिवूडला करेल नष्ट'- मीतू सिंगची सणसणीत प्रतिक्रिया

सुशांत सिंग राजपूतची बहीण मीतू सिंगने भावाच्या मृत्यूसाठी धरले बॉलिवूडला जबाबदार
Brahmastra/Sushant Singh Rajput
Brahmastra/Sushant Singh Rajput Dainik Gomantak
Published on
Updated on

Brahmastra: सुशांत सिंग राजपूतची बहीण मीतू सिंगने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या तिच्या नवीन पोस्टमध्ये तिने बॉलिवूडची खिल्ली उडवली आणि तिच्या भावाच्या मृत्यूसाठी बॉलिवूडला जबाबदार धरले. 'ब्रह्मास्त्र' रिलीज झाल्यानंतर तिची ही पोस्ट समोर आली आहे. मीटूने बॉलीवूडवर निशाना साधत सुशांतसोबत एक फोटो शेअर केला आहे.

या पोस्टमध्ये तिने लिहिले की, 'सुशांतचे 'ब्रह्मास्त्र' या बॉलिवूडला नष्ट करण्यासाठी पुरेसे आहे. बॉलीवूड नेहमीच जनतेवर हुकूमत गाजवतो, परस्पर आदर आणि नम्रता दाखवण्यासाठी कधीही थांबत नाही. एवढी नैतिक मूल्ये असलेल्या अशा लोकांना आपण आपल्या देशाचा चेहरा कसा बनवू शकतो? जनतेचे प्रेम जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न फसला आहे. प्रशंसा आणि आदर केवळ चांगुलपणा आणि नैतिक मूल्यांमधून मिळू शकतो.' यापूर्वीही चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी बॉलिवूडवर टिका करत 'बॉलीवूडमध्ये खूप खोटेपणा आहे', असे म्हटले होते.

Brahmastra/Sushant Singh Rajput
Kunal Kamara: शो रद्द केल्यानंतर कोमेडियन कामराचं विश्व हिंदू परिषदेला खरमरीत उत्तर

'ब्रह्मास्त्र' रिलीज झाल्यामुळे PVR आणि INOX सारख्या थिएटर्सना करोडोंचे नुकसान झाल्याचा दावा केला जात होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या 'ब्रह्मास्त्र'ला बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात झाली आहे. या चित्रपटाने दोन दिवसांत 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

Brahmastra/Sushant Singh Rajput
IAS ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोनू सूदने सुरू केले Free Class

सिनेसृष्टीला 800 कोटींचे नुकसान?

रणबीर आणि आलियासाठी 'ब्रह्मास्त्र' हा त्यांचा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट आहे. मात्र, चित्रपटाच्या पुनरावलोकनांमुळे PVR आणि INOX सारख्या चित्रपटगृहांच्या स्टॉकमध्ये घसरण झाल्याचा दावा करणारे अनेक अहवाल आहेत. शुक्रवारी चित्रपटगृहांचे सुमारे 800 कोटींचे नुकसान झाल्याचेही सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com