IAS ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोनू सूदने सुरू केले Free Class

असे करा फ्रि क्लाससाठी अप्लाई
IAS ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोनू सूदने सुरू केले Free Class
Published on
Updated on

अभिनेता सोनू सूद (Actor Sonu Sood) कोरोनाच्या काळात लोकांसाठी देवदूत म्हणून समोर आला. सोनू सूद आजही लाखो लोकांना मदत करत आहे. दर वीकेंडला त्यांच्या घराबाहेर जिल्हा रुग्णालयासारखी परिस्थिती असते. मदतीसाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. सोनू आता विद्यार्थ्यांसाठी एक नवीन योजना घेऊन आला आहे.

IAS ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोनू सूदने सुरू केले Free Class
Queen Elizabeth II यांचे पार्थिव बालमोरल येथून एडिनबर्गला रवाना

सोनू सूद आयएएस परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंग सुरू करणार आहे. अभिनेत्याने त्याच्या ट्विटर हँडलवर याबाबत एक पोस्ट केली आहे. ट्विटमध्ये सोनू सूदने असे लिहिले आहे की, 'चला मिळून नवा भारत घडवूया. संम्भवम् 22-23 असे या योजनेला त्याने नाव दिले आहे. या क्लासद्वारे IAS परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाइन कोचिंग दिले जाणार आहे.

अभिनेता सोनू सूदच्या मोफत कोचिंगसाठी विद्यार्थी सोनू सूद फाउंडेशन ग्रुपच्या लिंकवर नोंदणी करू शकतात. याशिवाय नोंदणीसाठी फाउंडेशनने पन्नास रूपये एवढी माफक फी ठेवली आहे. या कोचिंगद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना देशातील सर्वोच्च नागरी सेवा संस्थांमध्ये मोफत ऑनलाइन आयएएस कोचिंग दिले जाईल. याशिवाय फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही दिली जाणार आहे.

IAS ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोनू सूदने सुरू केले Free Class
Rahul Gandhi: तामिळनाडूच्या महिलांचा राहुल गांधींसमोर लग्नाचा प्रस्ताव...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com