BRAHMASTRA
BRAHMASTRADainik Gomantak

BRAHMASTRA: 'ब्रह्मास्त्र' चा शॉर्ट टीजर रिलीज, पाहा धमाकेदार व्हिडीओ

'ब्रह्मास्त्र'च्या टीझरमध्ये रणबीर-आलियाच नाही तर मौनी रॉयनेही जिंकली चाहत्यांची मन
Published on

'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाचा नवा टीझर रिलीज झाला होता, जो पाहून प्रेक्षकांची उत्कंठा वेगळ्याच पातळीवर पोहोचली आहे. ब्रह्मास्त्रचा नवीन टीझर सोशल मीडियावर समोर आला असून, त्यासोबतच चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. ब्रह्मास्त्रच्या टीझरमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत अमिताभ बच्चन, अक्किनेनी नागार्जुन आणि मौनी रॉय देखील दिसत आहेत. सोशल मीडिया वापरकर्ते हे सर्व एकत्र पाहून आणि टीझरचे सर्वोत्तम VFX पाहून एक्साइटिड आहेत.

ब्रह्मास्त्रचा ट्रेलर टीझर प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे. एकीकडे सोशल मीडिया वापरकर्ते चित्रपटाच्या कलाकारांबद्दल उत्सुक आहेत, तर दुसरीकडे उत्कृष्ट व्हीएफएक्सने भरलेल्या ट्रेलर टीझरने त्यांची उत्कंठा आणखीनच वाढवली आहे. ट्रेलर टीझरमध्ये मौनी रॉय आणि अक्किनेनी नागार्जुन यांनी जबरदस्त काम केले आहे. या दोघांकडे पाहून असे वाटते की, ते या चित्रपटात नक्कीच धमाकेदार काम करताना दिसणार आहेत.

आलियाच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट खूप खास आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट पहिल्यांदाच ऑनस्क्रीन चित्रपटात एकत्र दिसणार आहेत, याआधी त्यांनी काही जाहिरातींमध्ये एकत्र काम केले असले तरी, या दोघांनाही मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्याची उत्सुकता लागली आहे. ब्रह्मास्त्र चित्रपटातील केसरिया हे गाणे (Ranbir Kapoor) रणबीर-आलियाच्या लग्नाच्या खास प्रसंगी रिलीज करण्यात आले होते. केशरिया गाणे व्हायरल झाले आणि अजूनही खूप पसंत केले जात आहे.

BRAHMASTRA
Ranbir Video: रणबीर कपूरचे विशाखापट्टणममध्ये चाहत्यांकडुन जोरदार स्वागत

विशेष म्हणजे ब्रह्मास्त्रचे दिग्दर्शक
अयान मुखर्जी आणि रणबीर कपूर यांनीही चित्रपटाचे (Movie) प्रमोशन सुरू केले आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणबीर आणि अयान विशाखापट्टणमला पोहोचले आहेत.

अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर सुपर पॉवर शिवाच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर आलिया भट्ट ईशाच्या भूमिकेत दिसणार आहे. ब्रह्मास्त्रमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्याशिवाय अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली निर्मित हा चित्रपट 09 सप्टेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भारतीय भाषांमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट एक त्रयी मालिका असेल, ज्याच्या पहिल्या भागाचे नाव 'शिवा' आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com