Ranbir Video: रणबीर कपूरचे विशाखापट्टणममध्ये चाहत्यांकडुन जोरदार स्वागत

रणबीर कपूर बऱ्याच दिवसांनी रूपेरी पडद्यावर परतणार आहे, पण चाहत्यांमध्ये त्याच्याबद्दलची क्रेझ पूर्वीसारखीच आहे.
Ranbir Kapoor
Ranbir Kapoor Dainik Gomantak
Published on
Updated on

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) अलीकडेच आलिया भट्टसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर लगेचच तो आगामी चित्रपट 'अॅनिमल' च्या शूटिंगसाठी मनालीला पोहोचला होता. त्याचवेळी, काही दिवसांमध्ये तो विशाखापट्टणमला गेला तेव्हा त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. (Ranbir Kapoor Brahmastra Promotion News)

सर्वांना माहीत आहे की, रणबीर कपूर त्याच्या ब्रह्मास्त्र या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.

दरम्यान, रणबीर विशाखापट्टणमला पोहोचल्यानंतर त्याच्या चित्रपटाच्या (Movie) प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तेथे त्यांने यासाठी रॅली काढली आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, चाहत्यांनी त्याचे जोरदार स्वागत केले.

त्यांच्या शहरात आवडत्या अभिनेत्याला पाहून चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. यावेळी रणबीरसोबत दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते एस.एस. राजामौलीही उपस्थित होते.

चाहत्यांनी तिघांचे जल्लोषात स्वागत केले. आपल्या सुपरस्टारला पाहून चाहते इतके खूश झाले की त्यांनी त्याचे नाव घेऊन जोरजोरात ओरडायला सुरुवात केली.

Ranbir Kapoor
'जोधपूर में सलमान को मारेंगे, तब...' लॉरेन्स बिश्नोईचा जुना व्हिडिओ व्हायरल

रणबीर कपूर गेल्या 4 वर्षांनंतर रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. तो अखेरचा 2018 साली संजू चित्रपटात दिसला होता. मात्र, इतक्या दिवसांनी व्हिडिओ पाहिल्यानंतरही लोकांमध्ये रणबीरची क्रेझ कायम आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ब्रह्मास्त्र चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर, आलिया भट्ट (Alia Bhatt) मुख्य भुमिकेत दिसणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट 9 सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रेकक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com