'ब्रह्मास्त्र'मधील मौनी रॉयचा फर्स्ट लूक रिलीज, पोस्टरमध्ये दिसला डेंजर लूक

मौनी रॉयने 'ब्रह्मास्त्र' मधील तिचा फर्स्ट लूक शेअर करताना कॅप्शनमध्ये तिची व्यक्तिरेखा देखील उघड केली
Brahmastra Mouni Roy First Look
Brahmastra Mouni Roy First Lookinsta/Mouni Roy
Published on
Updated on

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर अभिनीत 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला, ज्यामध्ये स्टारकास्टचा लूक, चित्रीकरण सर्व काही पाहून चाहत्यांचा चित्रपटाबद्दलचा उत्साह आणखी वाढला आहे. 'ब्रह्मास्त्र'चा ट्रेलर 15 जूनला रिलीज होणार आहे, मात्र त्याआधी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या मौनी रॉयचा फर्स्ट लूक समोर आला आहे. मौनीचा हा लूक तुम्हाला भयंकर आणि थ्रिलर दिसत आहे. (Brahmastra Mouni Roy First Look)

मौनी रॉयने 'ब्रह्मास्त्र' मधील तिचा फर्स्ट लूक शेअर करण्यासोबत कॅप्शनमध्ये तिची व्यक्तिरेखा देखील उघड केली आहे. 'हे सगळं घे, तू अंधाराची राणी आहेस. ब्रह्मास्त्र प्राप्त करायचं, हा ध्यास घेतलाय,' असे कॅप्शन मौनीने या पोस्टला दिले आहे. या आधी मौनी रॉय अमिताभ बच्चन, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचाही लूक चित्रपटातून समोर आला आहे. या चित्रपटात मौनी नकारात्मक भूमिकेत दिसणार, असे तिचे लूक पाहून वाटते. चित्रपटात शाहरुख खानचीही छोटी भूमिका असणार आहे.

Brahmastra Mouni Roy First Look
'Vikram' च्या यशाबद्दल चिरंजीवी अन् भाईजानच्या हस्ते कमल हसन यांचा गौरव

धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखालील 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहे. चित्रपटात अमिताभ बच्चन व्यतिरिक्त रणबीर कपूर, आलिया भट्ट, मौनी रॉय, नागार्जुन अक्किनेनी, डिंपल कपाडिया हे देखील दिसणार आहेत. या चित्रपटात शाहरुख खानचीही छोटीशी भूमिका या दिसणार आहे.त्याची एक छोटीशी झलक नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये पाहायला मिळाली.

300 कोटींच्या तगड्या बजेटचा हा चित्रपट बनायला खूप वेळ लागला. पण आता अखेर तो रिलीज होणार आहे. चित्रपटात तुम्हाला भरपूर VFX पाहायला मिळतील. 15 जूनला ट्रेलर रिलीज झाल्यानंतर ब्रह्मास्त्र 9 सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी हिंदी तसेच तमिळ, तुलुगु, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Brahmastra Mouni Roy First Look
Indian Idolमधून रिजेक्ट झालेल्या गायकाच्या आवाजाचे लांखो तरूण फॅन

करण जोहरने 'मिस्ट्रियस क्वीन ऑफ डार्कनेस'

करण जोहरने मौनीला 'मिस्ट्रियस क्वीन ऑफ डार्कनेस' म्हटले आहे. चित्रपटाच्या टीझरमधील मौनीच्या लूकनेही चाहत्यांना उत्सुकता निर्माण केली होती. आता-रिलीज झालेल्या मोशन पोस्टरमध्ये, मौनी लाल डोळ्यांनी क्रोधित देवीसारखी दिसते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com