लोकेश कनागराज दिग्दर्शित 'विक्रम' (Vikram) हा चित्रपट 3 जून 2022 रोजी चित्रपटगृहामध्ये रिलीज झाला. चाहत्यांना हा चित्रपट खूप आवडला असुन कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने देश-विदेशातील बॉक्स ऑफिसवरील (Box Office) सर्व रेकॉर्ड तोडले आहे. विक्रमच्या यशाबद्दल देशभरातून कमल हसबचे अभिनंदन केले जात आहे. काल रात्री, मेगास्टार चिरंजीवी, सलमान खान आणि लोकेशन कनगराज यांनी कमल हासनला चित्रपटाच्या अफाट यशाबद्दल अभिनंदन करून सन्मानित केले. (chiranjeevi konidela salman khan felicitated kamal haasan spectacular success film vikram)
चिरंजीवींने सोशल मीडियावर (Social Media) काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्याच्यासोबत सलमान खान आणि लोकेश कनगराज देखील दिसत आहेत. सर्वांनी कमल हसन यांचा पुष्प व शाल देऊन गौरव केला. हे फोटो (Photo) शेअर करतांना चिरंजीवींने लिहिले- "माझा सर्वात जुना मित्र @ikamalhaasan याचा #विक्रमच्या अभूतपूर्व यशाबद्दल काल रात्री माझ्या घरी माझा प्रिय सल्लू भाई @BeingSalmanKhan @Dir_Lokesh आणि टीमसोबत साजरा केला आणि त्याचा सन्मान केला. हा एक अतिशय थरारक चित्रपट आहे. !!आभारी आहे मित्रा!! देव तुम्हाला आणखी शक्ती देवो!"
'विक्रम' चित्रपटगृहात रिलीज झाल्यापासून या चित्रपटाचे खुप कौतुक होत आहे. चित्रपटात कमल हासन एका निवृत्त रॉ एजेंटची भूमिका साकारत आहे. जो आपल्या मुलाच्या मृत्यूचा बदला घेतो. तो नार्कोटिक्स ब्युरोमध्ये गुप्तहेर अधिकारी आहे. त्याचबरोबर विजय सेतुपती आणि फहद फाजील हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहे. कमल फिल्म्स इंटरनॅशनल निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेशन कनगराज यांनी केले आहे. त्याचे संवाद रत्ना कुमार आणि लोकेश यांनी लिहिले आहेत. कमल हसन, विजय आणि फहाद यांच्याशिवाय कालिदास जयराम, नारायण आणि अर्जुन दास सहाय्यक भूमिकेत दिसत आहेत. त्याचवेळी तमिळ सुपरस्टार सुर्या 5 मिनिटांच्या कॅमिओ भूमिकेत दिसला आहे.
कमाईच्या बाबतीतही 'विक्रम' (Vikram) ने सर्व रेकॉर्ड मोडले आहे. एका आठवड्यात या चित्रपटाने जगभरात 250 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने (Movie) केवळ तामिळनाडूमध्ये 100 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाचे अफाट यश आणि कमाई पाहता असे म्हणता येईल की कमल हसनचा (Kamal Haasan) विक्रम चाहत्यांची मने जिंकण्यात यशस्वी झाला आणि कमाईचे नवे रेकॉर्ड तयार करणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.