Mia Khalifa On Israel: इस्त्रायल-हमास संघर्षात मिया खलिफाने केली पोस्ट; सोशल मीडियात खळबळ...

थेटपणे पॅलेस्टाईनची बाजू घेत इस्त्रायलवर केली टीका
Mia Khalifa
Mia Khalifa Instagram/@miakhalifa
Published on
Updated on

Mia Khalifa On Israel: इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमधील हमास या संघटनेतील पारंपरिक संघर्षाला पुन्हा धार चढली आहे. दोन्हीकडून सुरू झालेल्या जोरदार युद्धामुळे दोन्ही ठिकाणच्या नागरिकांची परिस्थिती बिकट झालेली असताना आता पूर्वाश्रमीची सुप्रसिद्ध पॉर्न स्टार मिया खलिफाने सोशल मीडियात एक पोस्ट केली आहे.

त्यामुळे सोशल मीडियात खळबळ माजली आहे. मियाने इस्त्रायलविरोधातील या युद्धात पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला आहे.

मियाने थेटपणे पॅलेस्टाईनची बाजू घेतली आहे. तिने म्हटले आहे की, पॅलेस्टाईनमधील परिस्थिती पाहूनही जर तुम्ही पॅलेस्टिनींच्या बाजूने नसाल, तर तुम्ही वर्णभेदाच्या चुकीच्या बाजूने आहात आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा इतिहास ते दाखवून देईल, असे मत मियाने सोशल मीडियात व्यक्त केले आहे.

Mia Khalifa
Israel War: इस्राइलमध्ये अडकली नुसरत भरुचा; युद्धभूमीवरुन भारतात परतण्यासाठी...

दरम्यान, या प्रदेशात सातत्याने हिंसाचार वाढत असल्याने इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय चर्चेत आला आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 198 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाल्याचे गाझामधील वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे.

आंतरराष्ट्रीय समुदाय या संघर्षावर बारीक लक्ष ठेवून आहे. सध्या तरी हे युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, मियाच्या या पोस्टनंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. मियाने यापुर्वीही अनेकदा इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षात इस्त्रायलविरोधात वक्तव्ये केली होती. पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ मियाने या नुकत्याच केलेल्या वक्तव्यामुळे लेबनीज-अमेरिकन मीडियाचेही लक्ष तिच्याकडे वेधले गेले आहे.

Mia Khalifa
Kareena Kapoor: बेबो दिसणार रोहित शेट्टीच्या 'या' चित्रपटात; सोशल मिडियावर पोस्ट करत केला खुलासा

त्यानंतर इंटरनेटवर नवा वाद सुरू झाला आहे. मियाच्या या वक्तव्यावर नेटिझन्सही तिच्या ट्विटर अकाऊंटवर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

मिया ही पूर्वी पॉर्न स्टार म्हणून काम करत होती. अलीकडच्या काही वर्षात ती या क्षेत्रातून बाहेर पडली आहे. त्यानंतर जगभरातील विद्यापीठांमध्ये तिला गेस्ट लेक्चरर म्हणून बोलावले गेले होते. सोशल मीडियात तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com