अलीकडेच बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार झुबीन गर्ग यांची प्रकृती बिघडली आहे. झुबीन बाथरूममध्ये गंभीर अवस्थेत आढळले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. 'या अली' या गाण्याने लोकांच्या हृदयात आपला ठसा उमटवणारे झुबीन रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेत आहे. झुबीन पडल्यामुळे त्याच्या डोक्याला पाच टाके पडले. डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार, त्याला डिहायड्रेशन आहे आणि त्याला शारीरिक अशक्तपणाही आहे. (Zubeen Garg Hospitalised news)
गायक आणि संगीतकार झुबीन गर्ग यांना बुधवारी संध्याकाळी एअरलिफ्ट करून डिब्रूगडमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रिपोर्ट्समध्ये डॉक्टरांनी सांगितले की, झुबीनला बाथरूममध्ये मिर्गीचा झटका आला होता. त्यानंतर तो बेशुद्ध पडला, त्यामुळे त्याला पाच टाकेही पडले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
आसामचे मुख्यमंत्री डॉ. हेमंत बिस्वा शर्मा यांनी दिब्रुगडच्या उपायुक्तांना गायक झुबीन गर्गवर लवकरात लवकर सर्व प्रकारचे उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. गरज भासल्यास गायकाला एअर अॅम्ब्युलन्सने उपचारासाठी कुठेही नेण्यास उशीर करू नका, असेही ते म्हणाले.
आसाममधील सर्वात महागडा गायक
झुबीन गर्गच्या (Zubeen Garg) गायन कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने इंग्रजी, कन्नड, कार्बी, खासी, मल्याळम, मराठी, मिसिंग, नेपाळी, ओडिया, सिंधी, तामिळ, तेलगू आणि तिवा यासह अनेक भाषांमध्ये गाणी (Song) गायली आहेत. आतापर्यंत 32 हजार गाणी रेकॉर्ड केली असून यासाठी ते गिनीज वर्ल्ड रेकॉर्डशी संपर्क साधणार असल्याचा दावाही झुबीनने केला आहे. आसामी भाषेतील सर्वात महागडा गायक (Singer) म्हणून झुबिनाकडे पाहिले जाते.
बहीणीचा मृत्यु
जुबीन गर्गला 'गँगस्टर' चित्रपटातील (Movie) 'या अली' या गाण्याने त्याच्या करिअरमधील सर्वात मोठा ब्रेक मिळाला. हे गाणं आजही लोकांना ओठांवर आहे. वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, झुबीनची बहीण जोंकी देखील एक अभिनेत्री आणि गायिका होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.