उस्ताद आनंद बक्षी (Anand Bakshi) यांच्यासारखा दुसरा गीतकार कोणी असूच शकत नाही. त्यांनी प्रेम, राग आणि रोमान्स या भावनांना गाण्यांच्या रूपात उतरवले जे आता भारतीय संगीत उद्योगाचे रत्न बनले आहे. आज, आनंद बक्षी यांच्या जयंतीनिमित्त, त्यांनी लिहिलेल्या 5 आयकॉनिक गाण्यांची यादी केली आहे जी तुम्हाला पुन्हा नॉस्टॅल्जियाच्या आनंदात घेऊन जातील. (5 evergreen songs written by Anand Bakshi)
दो लफ्जों की है
1979 च्या द ग्रेट गॅम्बलर चित्रपटाच्या ट्रॅकलिस्टमध्ये, दो लफ्ज़ों की है हे चित्रपटाचे मुख्य अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आशा भोसले आणि शरद कुमार यांच्या सहकार्याने गायले होते. आनंद बक्षी यांनी लिहिलेल्या, गाण्याचे बोल जीवनात प्रेम कसे असते यावर प्रकाश टाकतात असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. त्यांच्या रिलीजच्या जवळपास 5 दशकांनंतरही, दो लफ्ज़ों की है हे भारतीय संगीतांमध्ये सदाबहार गाण्यांपैकी एक आहे.
अच्छा तो हम चलते हैं
आन मिलो सजना मधील राजेश खन्ना आणि आशा पारेख यांची केमिस्ट्री कॅप्चर करणारा, अच्छा तो हम चलते हैं हे एक हिट रोमँटिक गाणे लता मंगेशकर यांनी सदाबहार किशोर कुमार यांच्या सहकार्याने गाजवले आहे. आनंद बक्षी यांनी लिहिलेले हे, अच्छा तो हम चलते है गाणे दोन प्रेमिकांमधील नवोदित नात्यातील कडू-गोड केमिस्ट्री मोहित करते.
प्यार दिवाना होता है
संगीतकार आरडी बर्मन यांच्या सुरात बनलेले, प्यार दीवाना होता है हे गाणे किशोर कुमार यांनी गायले. आनंद बक्षी यांचे हे रोमँटिक गाणे 1971 च्या कटी पतंग या हिंदी चित्रपटामधील आहे.
ये शाम मस्तानी
ये शाम मस्तानी हा कटी पतंग चित्रपटातील आणखी एक सदाबहार गाणे आहे. किशोर कुमार यांनी हे गाणे गायले आहे.
आज मौसम बडा बेमान है
आज मौसम बडा बेमान है 1973 च्या लोफर चित्रपटात धर्मेंद्र आणि मुमताज यांची क्लासिक केमिस्ट्री दर्शवते. या आयकॉनिक चित्रपटाचे संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी दिले होते. हे गाणे आनंद बक्षी यांनी लिहीले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.