मैत्रीमुळे आपले आयुष्य सुंदर क्षणांनी भरुन जातं ; जरी ते रक्ताचे नाते नसले तरीही असे कितीतरी मित्र असतात ज्यांना आपण रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त महत्त्व देतो. आज फ्रेंडशीप डे.. त्यानिमित्य पाहुया बॉलीवू़डचे असे काही चित्रपट ज्यांनी मैत्रीची व्याख्या सांगितली.
बॉलीवूडने आपल्याला अनेक चित्रपट दिले आहेत ज्यांनी आम्हाला मैत्रीची व्याख्या दिली आहेत. 6 जुलैला फ्रेंडशिप डे साजरा होत असताना, या खास दिवशी तुमच्या मित्रांसह बॉलीवूड ब्लॉकबस्टर्सवर एक नजर टाका.
राजकुमार हिरानी दिग्दर्शित हा चित्रपट तीन मित्रांची गोष्ट सांगतो. यातले दोन मित्र दीर्घकाळ हरवलेल्या मित्राच्या शोधात आहेत. ते त्यांच्या कॉलेजच्या दिवसांची आठवण करून देतात आणि त्यांच्या मित्राची आठवण काढतात ज्याने त्यांना वेगळ्या पद्धतीने विचार करायला शिकवलं, जरी इतर जगाने त्यांना "मूर्ख" असे नाव दिले असले तरीही ते मात्र त्यांच्या आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगत असतात.
छिछोरे एक दुःखद शोकांतिका म्हणजेच ट्रॅजेडी आहे. अनिरुद्ध या मध्यमवयीन व्यक्तीला त्याच्या कॉलेजच्या दिवसांची आठवण करून देण्यास प्रवृत्त करणारी ही कथा आहे. आयुष्य़ात हार मानलेला एक तरुण मैत्रीला त्याच्या शक्तीचा सोर्स बनवतो. या चित्रपटात दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत, श्रद्धा कपूर आणि वरुण शर्मा मुख्य भूमिकेत होते.
अयान मुखर्जी दिग्दर्शित आणि करण जोहर निर्मित, 'ये जवानी है दिवानी'ची कथा चार तरुण मित्रांभोवती फिरते जे त्यांच्या निश्चिंत महाविद्यालयीन दिवसांनंतर जीवनाच्या प्रवासाला सुरुवात करताना प्रेम आणि प्रेमभंगाच्या भावना अनुभवतात.
'दिल चाहता है' ही तीन मित्रांची गोष्ट आहे - आकाश हा बेफिकीर, प्रेमात विश्वास न ठेवणारा आहे. समीर सतत प्रेमासाठी "तयार" असतो पण त्यात नेमकं काय हवं आहे? याची त्याला कल्पना नसते. सिद्धार्थ हा तिघांपैकी सर्वात गंभीर आहे. या तीन मित्रांची गोष्ट जगण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन शिकवते.
अमिताभ बच्चन, बोमन इराणी, अनुपम खेर आणि परिणीती चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सूरज बडजात्या यांनी केले होते. हा चित्रपट तीन सेवानिवृत्त मित्रांच्या जीवनावर आधारित आहे जे आपल्या मरण पावलेल्या मित्राची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी एव्हरेस्ट बेस कॅम्पवर ट्रेक करतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.