Janhvi Kapoor: 'तो' सोबत असतो तेव्हा मला कम्फर्टेबल वाटते... कथित बॉयफ्रेंडबाबत काय म्हणाली जान्हवी

पुर्वी दोघे डेटिंग करत असल्याच्या चर्चा; आता दोघांमध्ये पुन्हा पॅचअप
Janhvi Kapoor
Janhvi KapoorDainik Gomantak
Published on
Updated on

Janhvi Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपुर सतत चर्चेत राहत असते. कधी तिच्या चित्रपटांमुळे, कधी सोशल मीडियातील हॉट फोटोजमुळे, कधी कुठल्यातरी वक्तव्याने तर कधी रिलेशनशिपच्या चर्चांमुळे. आताही जान्हवीने पुन्हा लाईमलाईट स्वतःकडे वळवून घेतला आहे. जान्हवीने तिच्या कथित बॉयफ्रेंडविषयी खुलासा केला आहे.

Janhvi Kapoor
Disha Patani: मेमरी लॉसमुळे तब्बल 6 महिने दिशाला काही आठवत नव्हते

जान्हवी अलीकडेच दिवाळी पार्ट्यांदरम्यान बऱ्याचवेळा ओरहान अवत्रमणीसोबत एकत्र दिसली होती. हे दोघे पुर्वी एकमेकांना डेट करत होते, असे म्हणतात. पण नंतर त्यांच्यात दुरावा आला होता. आता पुन्हा दोघे एकत्र दिसत असल्याने त्यांचे पॅचअप झाले आहे, असे दिसते.

नुकत्याच एका मुलाखतीत जान्हवीने ओरहान विषयीच्या तिच्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, 'मी ओरीला अनेक वर्षांपासून ओळखते. तो एकाप्रकारे माझी सपोर्ट सिस्टीम आहे. त्याने नेहमीच माझी साथ दिली आहे. तो जेव्हा सोबत असतो, तेव्हा मला खूप कम्फर्टेबल वाटते आणि माझा त्याच्यावर विश्वास आहे. असा मित्र भेटणं खुप भाग्याची गोष्ट आहे. आम्ही एकत्र असताना खूप मजा करतो. तो खूप चांगला मित्र आहे.

Janhvi Kapoor
Varun Dhawan: वरूण धवनला आहे 'हा' आजार; कामातून बऱ्याचदा घ्यावा लागतो ब्रेक

ओरहान आणि जान्हवी अनेकदा एकत्र दिसतात. एवढंच काय नुकतेच वरूण धवनच्या ‘बवाल’ चित्रपटाचे परदेशात शुटिंग सुरू असतानाही ओरहान जान्हवीसोबत होता. नुकताच रिलीज झालेल्या जान्हवीच्या 'मिली' चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळीही तो तिच्यासोबतच होता. विशेष म्हणजे, ओरहान हा केवळ जान्हवीचाच नव्हे तर सारा अली खान, अनन्या पांडे, शनाया कपूर, इब्राहिम खान, न्यासा या स्टार किड्सचाही चांगला मित्र आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com