Bollywood actor Arjun Rampal's girlfriend brother  arrested from Goa in connection with drugs case
Bollywood actor Arjun Rampal's girlfriend brother arrested from Goa in connection with drugs case Dainik Gomantak

अभिनेता अर्जुन रामपालच्या मैत्रिणीच्या भावाला गोव्यात ड्रग्स प्रकरणी अटक

NCB मुंबई (Mumbai) आणि गोवा (Goa) यांनी केलेल्या संयुक्त कारवाई
Published on

NCB मुंबई आणि गोवा यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालची (Arjun Rampal) गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रीएड्सच्या (Gabriela Demetriades) भावाला गोव्यातील (Goa) एका ड्रग्स (Drugs) प्रकरणी अटक केली. त्याच्याकडून चरस जप्त करण्यात आले आहे.

Bollywood actor Arjun Rampal's girlfriend brother  arrested from Goa in connection with drugs case
Goa Vaccination: 50 टक्के जनता ‘लसवंत’

सुशांत सिंग राजपूत प्रकरणानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ने मुंबईसह गोव्यात अनेक ठिकाणी छापेमारी सुरू ठेवली आहे. या प्रकरणातच पुढे आलेलं नाव म्हणजे अर्जुन रामपाल याची मैत्रीण गॅब्रियला चा भाऊ ऍगीसिलोस डेमेट्रीयड्स याला गोव्यातून अटक करण्यात आली आहे. उत्तर गोव्यातील शिवोली परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे

अशी माहिती एनसीबी च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे दक्षिण आफ्रिकन नागरिक असलेल्या ऍगीसिलोस डेमेट्रीयड्स यांच्याकडून हॅश आणि अल्प्राजोलम हे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. यापूर्वी ऍगीसिलोस डेमेट्रीयड्स ला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे अर्जुन रामपालची ही अंमली पदार्थ विरोधी विभागानं चौकशी केली होती त्याला मुंबई सेशन कोर्टाने 15 डिसेंबरला जामीन दिला होता . त्यावेळी त्याच्या कडून ट्रामाडौल हे अंमली पदार्थ जप्त केले होते या ड्रग्जवर भारतात बंदी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com