Goa Vaccination: 50 टक्के जनता ‘लसवंत’

गोव्यात कोरोना नियंत्रणात येत असून दोन्ही डोसाचे लसीकरण येत्या महिन्या दिड महिन्यात पुर्ण होणार आहे.
Goa Vaccination
Goa VaccinationDainik Gomantak

पणजी - गोव्यात (Goa) कोरोना (Covid-19) नियंत्रणात येत असून दोन्ही डोसाचे लसीकरण (Vaccination) येत्या महिन्या दिड महिन्यात पुर्ण होणार आहे. मोफत आरोग्य उपचार करणारे गोवा हे देशातील एकमेव राज्य आहे. दिल्लीतील नेत्यांनी गोव्यात येऊन बढाया मारु नयेत . कारण गोव्यात दिल्लीपेक्षा चांगल्या आरोग्य सुविधा आहेत. असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी आज केले.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत ५० टक्के लोकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले आहे. गेल्या २४ तासांत दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला, तर नवे ८४ कोरोना रुग्ण आढळून आले. दिवसभरात १५ हजार लसीकरणाची नोंद झाली आहे. राज्यात लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या ६ लाख २५ हजार ३२५ वर पोहचली आहे. ७१ जणांनी गृह अलगीकरण स्वीकारले असून १३ जणांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

Goa Vaccination
Vaccination: गोव्यातील लसीकरण होणार 45 दिवसात पूर्ण

तब्बल 1152 लोकांनी आपला पहिला डोस घेतला असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले. हे साडेअकराशे गोमंतकीय कुठे लपून बसले होते, मुख्यमंत्र्यांच्या (CM Pramod Sawant) आकडेवारीत त्यांची दखल कशी घेतली गेली नाही. इथपासून शंभर टक्के लसीकरणाची (Vaccination) घोषणा करण्याची अश्लाघ्य घाई तर सरकारला (Goa Government) झाली नव्हती ना, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

मात्र खरी परिस्थती बघता राज्यात कोरोना (Corona) नियंत्रणाची परीरिस्थिती बिघडत आहे. या आठवड्यात राज्यात एकही कोरोना बळी नोंदवला गेला नाही, मात्र कोरोनाबाधितांची संख्या काही कमी होतानाही दिसत नाही.काल राज्यात 102 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून राज्यात रोज शंभरहून अधिक नवे रुग्ण आढळत आहेत. राज्य सरकारने जवळपास सर्वच गोष्टींना परवानगी दिली आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नियमांची सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे.

गोव्यात सर्व काही खुले झाल्याचे कळताच देशी पर्यटकांच्या झुंडीच्या झुंडी गोव्यात दाखल होत आहेत. मोठ्या प्रमाणात गोव्यात दाखल होणाऱ्या पर्यटकांची तपासणी नाक्यावर तपासणी करणे शक्य होत नसल्याचेही कळते. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून ती संख्या 976 झाली आहे. 15 सप्टेंबर रोजी ही संख्या 700 होती. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कालपर्यंत 6014 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com