असूर 2 रिलीज झाला आणि कलयुगाला शिखरावर पोहोचवणाऱ्या शुभ जोशीची गोष्ट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक पुन्हा OTT कडे वळले आहेत. या वेब सिरीजमध्ये शुभ जोशीच्या पात्राला लेखकाने अशा रंगात रंगवले आहे की, प्रेक्षक या पात्राच्या भावनिक आणि मानसिक जडण घडणीचा शोध घेत या वेब सिरीजमध्ये गुंग झाले.
'असुर 2' रिलीज झाल्यापासून सगळीकडे त्याचीच चर्चा होत आहे. धनंजय राजपूत असो वा निखिल राय, रसूल असो की शुभ जोशी, प्रत्येक पात्राने चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. 'असुर 2' मध्ये पहिल्या सीझन प्रमाणेच कलाकार आहेत, म्हणजेच 'असुर'.
यावेळी म्हणजे 'असुर 2' मध्ये कली म्हणजेच शुभ जोशीने कलियुगला टोकाला नेले आहे, ज्यामुळे दुसरा सीझन आणखी 'धोकादायक' झाला आहे. या सीजनमध्ये शुभ जोशीची सर्वत्र चर्चा होत आहे.
शुभ जोशीची भूमिका करणारा मुलगा कोण आहे माहीत आहे का? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या मुलाने एका टीव्ही मालिकेत बरुण सोबतीच्या (निखिल राय) मुलाची भूमिकाही साकारली आहे
'असुर 2' मध्ये कलयुगाला शिखरावर पोहोचवणारा हा शुभ जोशी म्हणजेच विशेष बन्सलबद्दल चला जाणून घेऊया. शुभ जोशीची भूमिका अभिनेता विशेष बन्सलने केली असून तो १९ वर्षांचा आहे. 'असुर 2' मध्ये शुभ जोशी हे पात्र स्वतःला कली मानतं.
तो पौराणिक कथांवर विश्वास ठेवतो आणि धर्म आणि कर्मानुसार लोकांना मारतो. संपूर्ण जगात कलयुगाची स्थापना करून त्याला शिखरावर नेणे हे कली अर्थात शुभाचे उद्दिष्ट आहे. विशेष बन्सलने या व्यक्तिरेखेत जीव ओतला आहे. जेव्हाही हे पात्र पडद्यावर येते तेव्हा हृदयाचा ठोका चुकतो.
विशेष बन्सल याने अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो 'ना बोले तुम ना मैं कुछ कहा', 'इस प्यार को क्या नाम दूं', 'देवों के देव महादेव', 'बेंथा', 'सूर्यपुत्र कर्ण' आणि 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' सारख्या मालिकांमधून दिसला आहे. आहेत. विशेषने 'ना बोले तुम ना मैने कुछ कहा' या टीव्ही शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
इस प्यार को क्या नाम दूं या हिट टीव्ही शोमध्ये विशेष बन्सल अभिनेता बरुण सोबतीचा मुलगा झाला होता. 'असुर 2'मध्ये दोघेही एकमेकांसमोर आहेत. विशेष बन्सलने टीव्हीच्या मालिकांमधून आपल्या करिअरची सुरुवात केली.
'सूर्यपुत्र कर्ण'मध्ये त्याने वयाच्या 10 व्या वर्षी सर्व स्टंट स्वतः केले होते. खास या शोसाठी बन्सल यांनी वयाच्या 10 व्या वर्षी घोडेस्वारी ते तिरंदाजी आणि स्नो बोर्डिंग शिकले.
'असुर' आणि 'असुर 2' यांसारख्या वेब सीरिजशिवाय विशेष बन्सल 'ये मेरी फॅमिली' आणि 'स्कॅम 2' मध्येही दिसला आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की विशेष बन्सलने 'मदारी' चित्रपटात एका मुलाची भूमिका साकारली होती. हा मुलगा देशाच्या गृहमंत्र्याचा असुन त्याचं अपहरण अभिनेता इरफान खान करतो. विशेष बन्सल 2013 मध्ये आलेल्या 'बॉम्बे टॉकीज' या सिनेमातही दिसला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.