Big Boss OTT 2
Big Boss OTT 2Dainik Gomantak

Bigg Boss OTT 2 : बिग बॉसचं घर बनलं मॅट्रिमोनी सेंटर...इथं जुळल्या या जोड्या

बिग बॉस ओटीटीमध्ये खेळापेक्षा जोड्या जुळवण्याला जास्त महत्त्व दिलं जातंय असंच दिसतंय
Published on

बिग बॉस ओटीटी सध्या वेगळ्याच कारणांनी चर्चेत आहे. ओटीटी बिग बॉसची सध्या मनोरंजन विश्वात जोरदार चर्चा आहे. लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त असलेल्या या शोमध्ये आता रोजच नवनवे ट्विस्ट येत आहेत. बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्डमध्ये आलेले स्पर्धक शो चांगलाच गाजवत आहे. त्यातच एल्विश यादवने तर काही दिवसांत लोकप्रियता मिळवली आणि पुर्ण घरचं दणाणून सोडलं आहे.

बिग बॉस ओटीटीचे टास्क

काल घरात बीबी हेल्थ चेकअप'चे टास्क पाहिले गेले. या टास्कनंतर आशिका अविनाश यांच्यात राडाही झाला. एल्विशचे फलक नाज, जिया शंकर आणि अविनाश सचदेव यांच्यात तर भयंकर वादही झाला. तर शोमध्ये नॉमिनेशन टास्कही झाले. ज्यात 'भूखा शेर' टास्क करण्यात आला होता.

या टास्कमध्ये शेवटी, एल्विश यादव, आशिका भाटिया, अविनाश सचदेव, फलक नाझ, जैद हदीद आणि जिया शंकर यांना या आठवड्यात नॉमिनेट करण्यात आलं आहे.

नाज आणि अविनाश सचदेव

एकीकडे नॉमिनेशनमुळे वातावरण तापलं असतांना दुसरीकडे तर घरात पुन्हा प्रेमाचे वारे वाहत आहेत. यापुर्वी घरात फलक नाज आणि अविनाश सचदेव यांच्यात काही तरी शिजतयं असं चित्र होतं. अविनाश सचदेवने फलकला त्याच्या मनातली भावनाही सांगितल्या मात्र फलकने त्याच्या प्रेमाला नकार दिला. त्यामुळे ही लव्हस्टोरी पुढे सरकली नाही असं दिसतयं.

आणखी एक जोडी चर्चेत

बिग बॉसच्या घरात आणखी एक जोडी चर्चेत आली आहे. एल्विश यादव आणि मनीषा राणी यांच्या केमिस्ट्रीने सर्वांनाच धक्का दिला आहे.

सध्या सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एल्विश यादव आणि मनीषा राणी हे हातात हात घेवुन घरात फिरतांना दिसत आहे. दोघांना हातात हात घालून फिरताना पाहून बेबिका धुर्वे यांची प्रतिक्रियाही दिली.

नेटिजन्सच्या प्रतिक्रिया

या व्हिडिओत एल्विशने मनीषाचा हात धरला आणि त्याने पुजा भट्टचा आशीर्वाद घेतला. बाबिका धुर्वेने 'प्रीतीने धोखा दिला. घरातील सदस्यांनी देखील या जोडीवर खुप कमेंट केल्या तर दुसरीकडे नेटकऱ्यांनीही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी बिग बॉसमध्ये फक्त जोड्या जुळतात असा टोमणाही मारला आहे.

Big Boss OTT 2
Kangna Ranaut On Alia -Ranbir : हे खोटं लग्न आहे ! आलिया भट्ट आणि रणबीरवर कंगनाचं प्रश्नचिह्न...नेमकं म्हणायचंय काय?

जिया शंकर आणि अभिषेक मल्हान

तर दुसरीकडे जिया शंकरच्या मनात देखील प्रेमाचा बहर आलेला दिसत आहे. जिया शंकरला अभिषेक मल्हानबद्दल भावना असल्याचं दिसतयं. वीकेंड का वारमध्ये दोघांचा रोमँटिक डान्स व्हिडिओ नेटकऱ्यांना आवडला होता. तर अभिषेक आशिका भाटियासोबत फ्लर्ट करतांना दिसला. त्यामुळे आता घरात आणखी किती नवीन जोड्या जुळतात हे तर येणाऱ्या काही भागात दिसेल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com