
बिग बॉसच अशी वेळ आली आहे जेव्हा 'बिग बॉस 16'चा शेवट होईल आणि टॉप-5 स्पर्धकांपैकी एक या सीझनचा विजेता होईल. ट्रॉफीसाठी शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी आणि एमसी स्टेन यांच्यात चुरशीची लढत अपेक्षित आहे.
तथापि, सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की नवीनतम मतदानाच्या ट्रेंडनुसार, प्रियांका चौधरी 'बिग बॉस 16' ट्रॉफी धारण करणार आहे आणि शिव ठाकरे किंवा स्टेन यापैकी कोणीही प्रथम उपविजेते असतील. पण आता काही सांगणे कठीण आहे. कोण विजेता आणि कोण उपविजेता, हे काही तासांतच कळणार आहे.
'बिग बॉस 16' चा ग्रँड फिनाले 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजल्यापासून आहे. सलमान खान दोन आठवड्यांनंतर शोचा होस्ट म्हणून परत येत असून तो विजेत्याच्या नावाची घोषणा करणार आहे.
सध्या 'बिग बॉस 16' मधील टॉप-5 स्पर्धकांमध्ये शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी, एमसी स्टेन, शालीन भानोत आणि अर्चना गौतम आहेत. शिव, प्रियांका आणि स्टेन हे टॉप-3 स्पर्धक आहेत आणि त्यापैकी एकच विजेता असेल असे सांगण्यात येत आहे. पण तो कोण असेल, याची वाट पाहावी लागणार आहे.
बिग बॉसच्या 16 व्या सिजनची प्रचंड चर्चा केली जात आहे. यावेळच्या सिजनला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळालाच पण त्याचबरोबर या सिजनच्या वेळी शो कमर्शियल म्हणुनही हिट झाला. आज रात्री बिग बॉसचा अंतीम विजेता घोषित केला जाणार आहे. आजच्या
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.