Benny Dayal
Benny DayalDainik Gomantak

Beny Dayal Hit by Drone : गायक 'बेनी दयाल'ला कॉन्सर्टमध्ये ड्रोनची धडक, डोक्याला मार

गायक बेनी दयालला एका कॉन्सर्ट दरम्यान एक विचित्र अनुभव आला आहे
Published on

Beny Dayal Injured during Concert : गायक बेनी दयाल सध्या चर्चेत आहे. आपल्या अनोख्या आवाजाने फॅन्सना खुश करणाऱ्या बेनीने चाहत्यांना काळजीत पाडले आहे.'लेट्स नाचो', 'लत लग गई' 'बदतमीज दिल' आणि 'बेशर्मी की हाईट' यांसारख्या हिट गाण्यांसाठी ओळखला जाणारा गायक बेनी दयाल सध्या जखमी झाला आहे.

चेन्नई येथे एका कॉन्सर्टमध्ये सादरीकरण करत असताना, ड्रोनमधून पडल्याने त्यांना दुखापत झाली. यात त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला मार लागला आहे बोटांनाही किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे.

बेनी दयालने त्याच्यासोबत घडलेल्या या घटनेची माहिती इन्स्टाग्रामवरून दिली आहे. ड्रोन खाली पडल्यावर त्याचा शो कॅप्चर करत होता. 

बेनी इंस्टाग्रामवर गेला, जिथे त्याने घटनेशी संबंधित घटनाक्रम त्याने शेअर केला आहे. झालेल्या अपघाताची माहिती देताना बेनीने काही गोष्टींची तक्रारही केली आहे.

तो म्हणाला की ड्रोनच्या फॅन्समुळे त्याच्या डोक्याला मार लागला आणि त्याच्या बोटांनाही जखम झाली."ड्रोनचे फॅन्स, माझ्या डोक्याच्या मागच्या बाजूला आदळले आणि थोडी जखम केली. माझ्या दोन बोटांना पूर्ण जखम झाली. पण ते सर्व ठीक आहे. मला वाटते की मी यातून लवकर बरा होणार आहे,". .

बेनीने न चिडता शोच्या आयोजकांना काही गोष्टी सांगितल्या आहेत. तो म्हणाला शो मध्ये ड्रोन ऑपरेट करताना सर्टिफाईड व्यक्तिची निवड करायला हवी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही काही अजय, सलमान किंवा आणि कुठले सुपरस्टार नाही त्यामुळे कार्यक्रम व्यवस्थित दिसेल असा शूट करायला हवा, कुठल्याही दुखापतीशिवाय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com