बप्पी लहरी आणि गोमंतकीय संगीतकार

जॅझ पियानीस्ट आणि संगीतकार असलेले गोव्याचे (Goa) रॉनी मोन्सेरात बप्पी लहरींबरोबर 10 वर्षे होते.
 Bappi  Lahiri
Bappi LahiriDainik Gomantak
Published on
Updated on

बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांच्या सुरावटीनी एक काळ तरुणाईवर गारूड केले. ‘कोई यहॉ आहा नाचे नाचे’ किंवा ‘डिस्को डान्सर’ ही गाणी त्या काळात प्रत्येकाच्या ओठांवर होती. पाश्चिमात्य सुरावटींचा प्रभाव असलेल्या त्यांच्या गाण्यांच्या निर्मितीत गोमंतकीय संगीतकारांचाही वाटा नक्कीच होता.

जॅझ पियानीस्ट आणि संगीतकार असलेले गोव्याचे (Goa) रॉनी मोन्सेरात बप्पी लहरींबरोबर 10 वर्षे होते. ते त्या काळाची आठवण काढून म्हणतात, ‘त्यांच्याबरोबर काम करणे म्हणजे एखादी पिकनीक करण्यासारखे होते. वातावरणात एक प्रकारचा उबदारपणा असायचा. कामाच्या वेळी कुठल्याही प्रकारचा ताण-तणाव नसायचा. बप्पीने आमच्यातले उत्कृष्ट तेच नेहमी काढून घेतलं’. रॉनी असंही सांगतात, ‘अनेकांनी बप्पीवर संगीताच्या (Music) चोरीचा वाहीम ठेवला पण ते बरोबर नव्हते, आम्ही त्यांना स्टुडीयोमध्ये रात्रंदिवस काम करताना पाहीले होते. मी त्यांना फार जवळून ओळखत होतो. सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ते एकाच जागेवर बसून रहायचे. गाण्यांना संगीत देण्याची त्यांची गती अद्‍भूत होती. सरासरी ते एका दिवसात दोन गाण्यांना (Song) चाली लावायचे.’

 Bappi  Lahiri
स्वरा भास्करने हिजाब वादाची तुलना द्रौपदीच्या वस्त्रहरणाशी केल्याने यूजर्स भडकले

रॉनी यांच्या म्हणण्याप्रमाणे, बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांच्याबरोबर काम करण्याचा उत्कृष्ट भाग म्हणजे ते गीतकार, संगीत कंपोझर यांच्याबरोबर एकत्रीत बसायचे आणि त्याकडून उत्कृष्ट काम करुन घ्यायचा प्रयत्न करायचे. रॉनी बप्पीना गेल्या नोव्हेंबर महीन्यात 27 तारखेला, त्यांच्या वाढदिवशी शेवटचे भेटले. त्यांची तब्येत झपाट्याने खालावत आहे हे रॉनीना त्यावेळी जाणवले होते.

गोव्याचे प्रसिध्द गायक (Singer) , पद्‍मश्री रेमो फर्नांडिस यांनीही बप्पी लहरीबरोबरच्या आपल्या काही आठवणी आपल्या फेसबूकवर (Facebook) पोस्टवर टाकल्या आहेत. रेमो यानी बप्पीबरोबर दोन गाणी केली आहेत. रेमो लिहीतात, ‘फिल्म इंडस्ट्रीत भप्पीबद्दल अनेक विनोदी कथा पसरल्या होत्या. बप्पी परिधान करत असलेल्या सोन्याच्या (Gold) दागिन्यांबद्दल किंवा त्यांनी संगीतात केलेल्या हेराफेरीबद्दल. पण भप्पी खरोखर एक प्रेमळ माणूस होता. साधा, दयाळू आणि भोळ्या, निरागस ह्रदयाचा.

‘लव्ह इन गोवा’ (Love In Goa) या 1983 वर्षी रिलीज झालेल्या सिनेमात (Movie) बप्पी लहरीनी कोकणी गायक आल्फ्रेड रोज यांचा आवाजही वापरला होता. बप्पी लहरींच्या संगीत रचनांना अनेक गोमंतकीय वाद्य- कलाकारांनी आपल्या वाद्यातून सजवले आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com