स्वरा भास्करने हिजाब वादाची तुलना द्रौपदीच्या वस्त्रहरणाशी केल्याने यूजर्स भडकले

काही दिवसांपूर्वी केलेल्या ट्विटमध्ये स्वरा भास्करने द्रौपदीच्या (Swara Bhaskar) रिप ऑफची तुलना हिजाब वादाशी केली होती. या ट्विटमुळे स्वरा प्रचंड ट्रोल होत आहे.
Swara Bhaskar
Swara BhaskarDainik Gomantak
Published on
Updated on

सोशल मीडियावर जर कोणती अभिनेत्री सर्वात जास्त ट्रोल होत असेल, तर ती आहे स्वरा भास्कर. स्वराने काही पोस्ट केल्यास ट्रोलर्स लगेच त्यावर तुटुन पडतात. काही दिवसांपूर्वी केलेल्या ट्विटमध्ये स्वरा भास्करने (Swara Bhaskar) द्रौपदीच्या रिप ऑफची तुलना हिजाब (Hijab) वादाशी केली होती. या ट्विटमुळे स्वरा प्रचंड ट्रोल होत आहे. लोक तिला खडे बोल सुनावत आहेत. (Swara Bhaskar Compared Draupadis Rip Off To A Hijab Controversy)

स्वराने काय म्हटले?

स्वरा भास्करने ट्विट करुन म्हटले की, 'महाभारतात द्रौपदीचे जबरदस्तीने वस्त्रहरण करण्यात आले होते... मात्र जबाबदार, शक्तिशाली, कायदा करणारे केवळ नि केवळ बघतच राहिले... आज फक्त आठवले. स्वराच्या या ट्विटवर एका यूजरने म्हटले - द्रौपदीचे जबरदस्तीने वस्त्रहरण करण्यात आले होते मात्र तु स्वतः कपडे काढले? मला आज मिया खलिफाचा भारतीय लूक आठवला. तर दुसर्‍याने यूजर्सने म्हटले, द्रौपदीने हिजाब घातला नव्हता. आणि हो तुला आमच्या ऐतिहासिक ग्रंथांची आणि देवदेवतांची नावे घेण्याचा काही एक अधिकार नाही. त्याचवेळी तिसऱ्या यूजर्सने म्हटले, दीदी, या ट्विटसाठी तुम्हाला किती मिळाले?

Swara Bhaskar
"बुरखा, पगडी अन् क्रॉस काय? '': कर्नाटक उच्च न्यायालयात हिजाब प्रकरणावर सुनावणी

तसेच चौथ्या यूजर्सने म्हटले, 'तुम्ही हिंदू आहात, याची आम्हाला लाज वाटते.' या ट्विटवरुन अनेकांनी स्वराला हिंदुविरोधी ठरवले आहे. त्याचबरोबर अनेकांनी तिला हिंदू धर्म सोडण्याचाही सल्ला दिला. असे नाही की स्वराने हिजाबच्या मुद्द्यावर आपले मत पहिल्यांदाच व्यक्त केले आहे. स्वरा अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे ट्रोल होते.

शिवाय, यापूर्वी स्वराने एका मुस्लिम विद्यार्थिनीचा (Muslim Student) व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये काही मुले धार्मिक घोषणा देत होते. या व्हिडिओवर टीका करताना स्वराने त्या मुलांना ‘भेड़िया’ म्हटले आहे. त्यानंतर स्वराचे हे ट्विट खूप व्हायरल झाले होते.

Swara Bhaskar
शाळेत ड्रेसकोडच्या रंगात हिजाब घालण्यास परवानगी द्या; कर्नाटक हायकोर्टात मागणी

नेमका वाद काय?

जानेवारीमध्ये, उडुपीच्या एका कॉलेजमधील काही विद्यार्थिनींना हिजाब परिधान केल्याबद्दल वर्गात प्रवेश नाकारण्यात आला होता. या प्रकरणाबाबत एका विद्यार्थिनीने कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन हिजाब घालून वर्गात जाण्याची परवानगी मागितली होती. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांदरम्यान कर्नाटकातील हिजाबच्या वादामुळे देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. मात्र या संधीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न राजकारणी लोक करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com