Ashok Grover Passes Away : शार्क टॅँकच्या या जजवर दु:खाचा डोंगर, वडिलांचे झाले निधन...

शार्क टँकचा फेमस जज अश्नीर ग्रोव्हरच्या वडिलांचे निधन झाले आहे, ते भारत पे चे सहसंस्थापक होते.
Ashok Grover Passes Away
Ashok Grover Passes AwayDainik Gomantak
Published on
Updated on

शार्क टँकच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही बातमी शार्क टँक इंडिया 1' फेम अश्नीर ग्रोव्हरच्या संदर्भातील आहे. अश्नीरचे वडिल आणि भारतपेचे सहसंस्थापक अशोक ग्रोव्हर यांचे निधन झाले आहे . 

ते 70 वर्षांचे होते. अश्नीरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर भावनिक नोटमध्ये त्याच्या चाहत्यांना आणि फॉलोअर्ससोबत ही बातमी शेअर केली. त्याने चिठ्ठीसोबत वडिलांचा फोटोही शेअर केला आहे.

अश्नीर ग्रोव्हरने आपल्या वडिलांचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आणि आपल्या फॉलोअर्सना वडिलांच्या मृत्यूची माहिती दिली. झालेल्या या मोठ्या हानीबद्दल शोक व्यक्त करताना अश्नीर ग्रोव्हरने लिहिले - बाय पापा. तुझ्यावर प्रेम आहे ! पापाजी, मोठ्या मम्मी, आजोबा आणि आजीची स्वर्गात काळजी घ्या. अशोक ग्रोवर

Ashok Grover Passes Away
Mrs Chatterjee Vs Norway : "चित्रपटाच्या रिलीजपूर्वी मी खूप घाबरले होते !"राणी मुखर्जी असं का म्हणाली?

अश्नीरचे वडील अशोक ग्रोव्हर चार्टर्ड अकाउंटंट होते. त्यांच्या मृत्यूची कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत. .शार्क टँक इंडियाच्या पहिल्या सीझनमध्ये अश्नीर दिसल्यापासून तो प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. तो दुसऱ्या सीझनचा भाग नसला तरी त्याची अनुपस्थिती नेटकऱ्यांना खूप जाणवली. 

तो त्याच्या वन-लाइनर्स आणि त्याच्या एका शब्दाच्या 'दोगलापन'साठी प्रसिद्ध झाला. हा शब्द इतका प्रसिद्ध झाला की अश्नीरने 'दोगलापन' नावाचे पुस्तक लिहिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com