Birthday Special: आशा भोसले घरगुती हिंसाचाराला पडल्या होत्या बळी

'आजा आजा मैं हूं प्यार तेरा' सारखी हजारो सुपरहिट गाणी देणाऱ्या गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या नावावर अनेक पुरस्कार आणि रेकॉर्ड आहेत.
Birthday Special - Asha Bhosle
Birthday Special - Asha BhosleDainik Gomantak
Published on
Updated on

'आजा आजा मैं हूं प्यार तेरा' सारखी हजारो सुपरहिट गाणी देणाऱ्या गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या नावावर अनेक पुरस्कार आणि रेकॉर्ड आहेत. 8 सप्टेंबर 1933 रोजी जन्मलेल्या आशा यांनी1 943 मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि तेव्हापासून त्या आतापर्यंत सतत गात आहेत .

त्यांनी 1948 मध्ये चुनारिया चित्रपटातून हिंदी चित्रपटांमध्ये गायनाची सुरुवात केली. हंसराज बहल यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी 'सावन आया' हे पहिले गाणे गायले. यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही, त्यांनी एक हजाराहून अधिक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.

संगीताच्या इतिहासातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या गायिका म्हणून 2011 मध्ये त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे. त्यांनी परदेशी सेलिब्रिटींसोबत अनेक गाणी देखील तयार केली आहेत. फार कमी लोकांना माहित आहे की आशा भोसले यांनी 'माय' चित्रपटात देखील काम केले आहे.

Birthday Special - Asha Bhosle
Video: 'बचपन का प्यार' गाणारा सहदेव पुन्हा चर्चेत; नवं गाणं ऐकाच

आशा वयाच्या 16 व्या वर्षी घरातून गेल्या होत्या पळून

'सूर कोकिला' लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची बहीण आशा भोसले यांचे आयुष्य खूप चर्चेत आहे. आशा फक्त 15-16 वर्षांच्या होत्या जेव्हा त्या प्रेमात पडल्या. प्रेम इतर कोणाबरोबर नाही तर मोठी बहीण लता मंगेशकर यांच्या वैयक्तिक सेक्रेटरीशी झाले होते.

आशा यांच्या कुटुंबीयांना जेव्हा त्यांच्या लग्नाची माहिती मिळाली तेव्हा संपूर्ण कुटुंब याच्या विरोधात गेले. त्यावेळी आशा कुणाचेही ऐकत नव्हत्या आणि गणपतसह घरातून पळून गेल्या. लग्नाच्या वेळी गणपत 31 वर्षांचे आणि आशा 16 वर्षांच्या होत्या.

लग्नानंतर घरगुती हिंसाचाराच्या बळी

लग्नानंतर जेव्हा आशा (Asha Bhosle first marriage) त्यांच्या पतीच्या घरी गेल्या, तेव्हा त्यांना त्यांची चूक तिथे समजली. खरं तर गणपतरावांच्या घरच्यांनीही दोघांचे लग्न स्वीकारले नाही. ज्यामुळे त्यांच्यावर मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, दरम्यानच्या काळात दोघांमधील संबंध बिघडले. लग्नाला कंटाळून आशा आपल्या सासरचे घर सोडून त्यांच्या घरी परतल्या.

पहिले लग्न मोडल्यानंतर आशा भोसले यांनी त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्यास सुरवात केली. जेव्हा त्यांनी गाण्यात नाव कमावले, पुन्हा एकदा एक खास व्यक्ती त्यांच्या आयुष्यात आले. 47 वर्षीय आशा यांनी दुसरे लग्न दिग्गज संगीतकार राहुल देव बर्मन यांच्याशी केले, जे त्यांच्यापेक्षा 6 वर्षांनी लहान होते. आरडीचे हे दुसरे लग्न होते.

लग्नाच्या 14 वर्षानंतर बर्मन साहेबांचे निधन झाले आणि पुन्हा एकदा आशा एकट्या पडल्या. लोक प्रेमाने राहुल देव बर्मन यांना पंचमदा म्हणूनही संबोधतात. आशा भोसलेंना तीन मुले आहेत, दोन मुलं हेमंत आणि आनंद आणि एक मुलगी वर्षा भोसले.

Birthday Special - Asha Bhosle
अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन

पुरस्कार आणि सन्मान

आशा ताई (Asha Bhosle awards) यांना आतापर्यंत 7 सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. यासोबतच त्यांना 2 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. आशा भोसले यांना 2008 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा देवी सिंह पाटील यांनी 'पद्मविभूषण' देऊन सन्मानित केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com