समीर वानखेडे गेल्या काही काळापासुन आर्यन खान ड्रग्ज क्रुज प्रकरणामुळे चांगलेच चर्चेत आहेत. या प्रकरणात चुकीचा तपास केल्याचा तसेच शाहरुख खानकडे 25 कोटींची लाच मागितल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर होता. गेल्या काही काळात या प्रकरणाला राजकीय वळण मिळतंय की काय अशीही शक्यता निर्माण झाली होती.
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानशी संबंधित ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडेंवर लाचखोरीचा आरोप करण्यात आला होता. एनसीबीच्या माजी झोनल डायरेक्टरवर आर्यन खानला वाचवण्यासाठी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप आहे.
2021 साली देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आर्यन खानवर ड्रग्ज सेवन, ड्रग्ज बाळगणे आणि ड्रग्ज खरेदी-विक्रीचा आरोप केला होता.
समीर वानखेडेंवर आर्यन खानला एका नियोजित कटात रचून नंतर खंडणी म्हणून पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. आता केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने (कॅट) या तपासावरच प्रश्न उपस्थित केले आहेत. अशा परिस्थितीत या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सेटच्या अहवाल प्राथमिक स्वरूपाचा होता या एनसीबीच्या युक्तिवादाची कॅटनेही दखल घेतली आहे. समीर वानखेडेवरील कारवाईबाबत केंद्र सरकार आणि एनसीबीकडून स्वतंत्र निर्णय घेतला जाईल.
ज्ञानेश्वर सिंह यांच्या अध्यक्षतेखालील SET च्या निष्कर्षांनुसार, न्यायाधिकरणाच्या न्यायमूर्तींच्या खंडपीठाने समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयने नोंदवलेला खंडणी आणि लाचखोरीचा खटला रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी केली.
या प्रकरणात, समीर वानखेडेसह इतर चौघांनी 2021 मध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यनला गोवण्यासाठी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप होता.
आर्यन खानचे वडील शाहरुख खान सध्या त्याचा 'जवान' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तयारीत आहेत. हा चित्रपट गुरुवार, 7 सप्टेंबर रोजी जन्माष्टमीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. 31 ऑगस्ट रोजी चित्रपटाचा ट्रेलर समोर आला तेव्हा अचानक समीर वानखेडे पुन्हा चर्चेत आले.
या चित्रपटात एक संवाद आहे, ज्यात शाहरुखचे पात्र म्हणते, ' मुलाला हात लावण्यापूर्वी वडिलांशी बोल.' चाहत्यांनी हा डायलॉग सोशल मीडियावर खूप ट्रेंड केला. शाहरुखने हा डायलॉग फक्त समीर वानखेडेसाठी म्हटल्याचे दिसत असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे हा डायलॉग व्हायरल झाल्यानंतर समीर वानखेडेने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर निकोल लायन्सने लिहिलेली एक अप्रत्यक्ष उत्तरही दिलं. त्यांनी लिहिले, 'मी आग चाखली आहे आणि मी जळलेल्या प्रत्येक पुलाच्या राखेवर नाचलो आहे. मी तुला घाबरत नाही.'