Shree Ram Navami : स्वत: प्रभू श्रीराम सीतामातेसह आले दर्शन द्यायला...अरुण गोविल आणि दिपीका चिखलिया यांचा व्हिडिओ व्हायरल...

आज 30 मार्च रोजी संपूर्ण देश रामनवमीचा उत्साह साजरा करत आहे.
Arun Govil 
Deepika Chikhalia
Arun Govil Deepika ChikhaliaDainik Gomantak
Published on
Updated on

चैत्र नवरात्रीची नवमी तिथी म्हणजेच राम नवमी 30 मार्च रोजी देशभरात साजरी केली जात आहे. या निमित्ताने जिथे लोक आपापल्या घरात आणि मंदिरात मुलींची पूजा करत आहेत, तिथे ते एकमेकांना रामनवमीच्या शुभेच्छा संदेशही पाठवत आहेत. 

रामानंद सागर यांच्या 'रामायण' या मालिकेत राम, सीता आणि लक्ष्मण यांची भूमिका साकारणारे अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लाहिरी यांनीही सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

90 च्या दशकात आलेल्या 'रामायण'ने दीपिका चिखलिया, अरुण गोविल आणि सुनील लाहिरी यांना घरोघरी प्रसिद्ध केले. लोक अरुण गोविल यांची खऱ्या आयुष्यात राम म्हणून पूजा करू लागले, तर दीपिका चिखलिया आणि सुनील लाहिरी जिथे जिथे गेले तिथे लोक त्यांना सीता आणि लक्ष्मण म्हणून पूजू लागले. 

अरुण गोविल, दीपिका आणि सुनील लाहिरी यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपट केले, अनेक भिन्न पात्रे साकारली. पण तरीही लोक त्यांना 'राम सीता आणि लक्ष्मण' मानतात.

Arun Govil 
Deepika Chikhalia
Bhola Movie Twitter Reaction : टाळ्या शिट्ट्यांसह थिएटरमध्ये जल्लोष...भोला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला...

सर्व देशवासियांना रामनवमीच्या शुभेच्छा देताना अरुण गोविल यांनी ट्विट केले की, 'रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. प्रभू श्री राम आपल्या सर्वांवर कृपा करोत.

 आणखी एका ट्विटमध्ये अरुण गोविल यांनी नुकतेच सांगितले होते की कोणते दान सर्वात मोठे दान आहे. त्यांनी लिहिले की, 'जेव्हा कुणाला देण्यासारखे काही नसते, तेव्हा प्रेम आणि आदर देणे हीदेखील मोठी देणगी असते. जय श्री राम.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com