Anupam Kher's Mother On PM Modi : अनुपम खेर यांच्या आईकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक म्हणाल्या...व्हिडीओ व्हायरल...

अभिनेते अनुपम खेर यांच्या आईने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे.
Anuam Kher Birthday Special
Anuam Kher Birthday Special Dainik Gomantak
Published on
Updated on

अनुपम खेर यांच्या आईने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे.  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहे. सध्या त्यांच्यावरुन ज्या मुद्द्यावर चर्चा सुरु आहे तो म्हणजे त्यांचे शिक्षण आणि त्यांची पदवी.

यावरुन सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. नेटकऱ्यांनी तर ट्विटवर काही भन्नाट मीम्स देखील व्हायरल केले आहे. विरोधी पक्षांनी नेहमीप्रमाणे मोदींची खिल्ली उडवली आहे. यासगळ्यात एक प्रतिक्रिया अनेकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काही अनेकवेळा मोदीजी आणि त्यांचे शिक्षण, त्यांची पदवी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केजरीवाल यांनी तर मोदींकडे त्यांच्या डिग्रीची मागणी केली होती.

त्यावरुन नेटकऱ्यांनी केजरीवाल यांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका केल्याचे दिसून आले आहे. केवळ केजरीवालच नाहीतर इतर नेत्यांनी देखील मोदींजींवर टीका केली आहे.मोदींनी त्यांच्या शिक्षणाची कागदपत्रं ही सार्वजनिक करण्याची वेळ आली आहे. असे म्हणत वेगळ्याच चर्चेला तोंड फोडले आहे.

केजरीवाल यांनी ती मागणी केल्यानंतर काही काळ आम आदमी पार्टी आणि भाजप यांच्यात पोस्टरबाजी सुरु असल्याचे दिसून आले आहे. वेगवेगळे मीम्स देखील व्हायरल झाले असून त्यावर नेटकऱ्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया भलत्याच भन्नाट असल्याचे दिसून आले आहे.

केजरीवाल यांनी जेव्हा मोदींवर प्रश्न उपस्थित केले तेव्हा गुजरात कोर्टानं केजरीवाल यांनाच प्रतिप्रश्न करुन त्यावरील याचिका रद्द केली होती. याशिवाय त्यांना २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला होता.

Anuam Kher Birthday Special
Besharam Rang Copy Of Makeba: शाहरूख दीपिकाचं 'बेशरम' गाणं वादाच्या भोवऱ्यात; ट्विटरवर युजर्सने केला मोठा आरोप

यासगळ्यात बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्या आईंनी दिलेली प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे. ती प्रतिक्रिया सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाली आहे. खेर यांनी सोशल मीडियावरुन व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्यामध्ये खेर यांच्या मातोश्री म्हणतात, तुम्हाला वाटतं ते शिकले नाहीत का, तसं असेल तर तुम्हाला त्यांना शिकवावे लागेल.

ते नंतर तुम्हाला सगळ्यांना शिकवतील. आणि डोकं असेल तर शिकायला काय हरकत नाही. तुम्हाला तसे वाटत असेल पण ते तुम्हा सगळ्यांना शिकवतील हे मात्र नक्की. त्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com