Satish Kaushik Passes Away : मध्यरात्रीच 'सतीश कौशिक'यांना चाहुल लागली होती...अनुपम खेर यांनी सांगितला घटनाक्रम

काय घडलं नेमकं कालच्या रात्री सांगतायत अभिनेते अनुपम खेर
Satish Kaushik Passes Away
Anupam Kher
Satish Kaushik Passes Away Anupam KherDainik Gomantak

Anupam Kher on Satish Kaushik Passing: सतीश कौशिक यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी त्यांचे जिवलग मित्र अनुपम खेर यांनी गुरुवारी सकाळी ट्विटरवर शेअर केली. 

त्यांनी सांगितले की सतीश कौशिक त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी दिल्लीत होते. अनुपम खेर यांनी काल रात्रीचा घटनाक्रम सांगितला आहे.

गुरुवारी सकाळी आपल्या ट्विटमध्ये अनुपम खेर यांनी सांगितले की, त्यांचा मित्र सतीश कौशिक आता या जगात नाही. ही बातमी शेअर करताना त्याने सतीश कौशिकसोबतचा फोटोही शेअर केला आहे. 

अनुपम खेर यांनी सतीश कौशिक यांच्या मृत्यूबद्दल माध्यमांशी संवाद साधला आणि शेवटच्या क्षणी नेमकं काय झालं ते सांगितलं आहे.

सतीश कौशिक यांनी अस्वस्थतेची तक्रार केली: त्यांनी सांगितले की, सतीशने अस्वस्थतेची तक्रार केली तेव्हा तो दिल्लीत एका मित्राच्या घरी होता. 

अनुपम म्हणाले, 'त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांनी ड्रायव्हरला हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले. वाटेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी रात्रीचे साधारण १ वाजले होते.

Satish Kaushik Passes Away
Anupam Kher
Kavita Krishnamurthy : "अलका याग्निक किंवा कुमार सानुला खूप पैसे मिळाले ;पण मी..." कविता कृष्णमुर्ती असं का म्हणाल्या?

मिळालेल्या माहितीनुसार, सतीश कौशिक (सतीश कौशिक पोस्टमॉर्टम) यांचे पोस्टमॉर्टम गुरुवारी दिल्लीतील दीनदयाल रुग्णालयात होणार आहे. वृत्तानुसार, सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांचा मृतदेह रुग्णालयात आणून शवागारात ठेवण्यात आला.

 सकाळी 11 च्या सुमारास त्यांचे शवविच्छेदन झाले आहे . त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईतील त्यांच्या घरी आणण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com