Bheed Trailer Release : लॉकडाऊनची भयाणता दाखवणारा 'भीड'...ट्रेलर रिलीज

अनुभव सिन्हा दिग्दर्शित भीड या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.
Bheed Trailer Release
Bheed Trailer ReleaseDainik Gomantak
Published on
Updated on

Anubhav Sinha's Bheed Trailer Release : 2019 साल कोण विसरेल? शतकातली एक मोठी महामारी संपूर्ण जगाने पाहिली. जवळपास सगळ्या क्षेत्रावर लॉकडाऊनचा परिणाम झाला.

उद्योग, शिक्षण, मनोरंजन सगळ्याच क्षेत्रातल्या लोकांची ससेहोलपट या काळात झाली. आता यावर एक कलाकृती येतेय. आणि त्याचं ट्रेलर नुकतंच रिलीज झालं आहे.

कोविड-19 महामारीच्या काळोख्या काळावर आधारित 'भिड' या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण T-Series द्वारे करण्यात आले. त्यांनी शुक्रवारी त्यांच्या YouTube चॅनेलवर जवळपास अडीच मिनीटांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

2020 मधील पहिल्या लॉकडाऊनचा स्थलांतरित कामगारांवर झालेला परिणाम ट्रेलरमध्ये दाखवण्यात आला आहे

ट्रेलरमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा करताना, शेकडो स्थलांतरित कामगारांनी घरी परतण्याचा प्रयत्न केला.

स्थलांतरित कामगार रस्त्याच्या कडेला बसले असताना त्यांना मारहाण होत आहे आणि त्यांच्यावर जंतुनाशक फवारले जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

एका प्रामाणिक पोलिसाची भूमिका करणारा राजकुमार राव म्हणाला, “न्याय हा नेहमीच ताकदवानांच्या हातात असतो. जर शक्तीहीन व्यक्तीने न्याय दिला तर न्याय वेगळा असेल.” 

जसजसा ट्रेलर चालू होता तसतसा तो गरीब लोकांसाठी लढताना दिसला. या क्लिपमध्ये दिया मिर्झा एका मुलाशी फोनवर बोलत असताना रडत असल्याचेही दाखवण्यात आले आहे.

Bheed Trailer Release
Lock-Up Season 2 : हे 6 सेलिब्रिटी जाणार 'कंगना रणौत'च्या जेलमध्ये...लॉक -अप सीजन 2 लवकरच

पत्रकाराची भूमिका करणारी कृतिका कामरा स्थलांतरित मजुरांच्या दुरवस्थेबद्दल बोलत आहे. तिने कोविड-19 लॉकडाउन परिस्थितीची तुलना 1947 मधील भारताच्या फाळणीशी केली.

तबलिगी जमातनंतर पसरलेल्या संसर्गाच्या अफवांदरम्यान पंकज कपूर आपल्या बसमधील मुलांना मुस्लिम पुरुषांनी दिलेले अन्न खाऊ देत नाहीत हा सीन शहारे आणणारा आहे. ट्रेलरमधली ही वाक्यं हृदयाला भिडणारी आहेत. चित्रपटाचा हा ट्रेलर जरूर बघा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com