Amitabh Bachchan: एअरफोर्स जॉईन करण्याच्या स्वप्नांना उंचीचा अडथळा ....बिग बींनी सांगितली अधुऱ्या ध्येयाची गोष्ट

Amitabh Bachchan: त्यामुळे त्यांना तरुण कलाकार आणि प्रेक्षक-चाहत्यांकडून प्रेम मिळत असते. त्यांना मोठी पसंती मिळते.
Amitabh Bachchan
Amitabh BachchanDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन हे बॉलीवूड इंडस्ट्रीमधील असे अभिनेते आहेत ज्यांचे लाखो करोडो चाहते तर आहेतच मात्र इंडस्ट्रीतील अनेकजण त्यांना आपले प्रेरणास्थान मानते.

अमिताभ बच्चन यांचा उत्तम अभिनय, भारदस्त आवाज आणि कोणालाही भुरळ पाडावी अशी उंची ही त्यांच्या जमेची बाजू समजली जाते. मात्र आता त्यांच्या उंचीमुळे विशेषत: उंच पायांमुळे त्यांचे एक स्वप्न अपूर्ण राहिल्याचा खुलासा चक्क अमिताभ बच्चन यांनी केबीसीच्या मंचावर स्वत:च केला आहे.

अमिताभ बच्चन केबीसीच्या मंचावर स्वत:च्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. त्यांनी त्यांच्या उंच पायांमुळे त्यांना एअर फोर्सच्या भर्तीमधून रिजेक्ट केले असल्याचे त्यांनी प्रसंग सांगितला आहे.

Amitabh Bachchan
राज कुंद्रा - शिल्पा शेट्टी जोडीने एकमेकांचा हात सोडला? पोस्ट शेअर करत म्हणाले

ते म्हणतात- मी एअर फोर्समध्ये भरती होऊ इच्छित होतो. 'जेव्हा मी मुलाखतीसाठी गेलो होतो तेव्हा माझे पाय खूप लांब असल्याचे सांगून त्यांनी मला नाकारले. मी हवाई दलासाठी पात्र असू शकत नसल्याचे मला सांगण्यात आले आणि माझे स्वप्न अपूर्णच राहिले.

८१ वर्षांचे अमिताभ बच्चन आजही सुपरअॅक्टिव्ह असतात. ते केबीसी( KBC )च्या मंचावरुन प्रेक्षकांचे मनोरंजन( Entertainment ) करतात, आपल्या ब्लॉग्समधूनदेखील ते व्यक्त होत असतात. काळाप्रमाणे बदलणारे अभिनेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांना तरुण कलाकार आणि प्रेक्षक-चाहत्यांकडून प्रेम मिळत असते. त्यांना मोठी पसंती मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Modi Cabinet Reshuffle 2026
Goa First Alliance 2027
Dadu Mandrekar Biography
Akshay Kumar College Love Story
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com