गुलाबी ओठांची चेष्टा करणाऱ्यांची टायगर श्रॉफने केली बोलती बंद

टायगर श्रॉफ त्याचे वडील जॅकी श्रॉफ यांचा खूप लाडका आहे. त्याचे खरे नाव टायगर नसून हेमंत श्रॉफ आहे.
Tiger Shroff
Tiger ShroffDainik Gomantak
Published on
Updated on

Happy Birthday Tiger Shroff: टायगर श्रॉफ (Tiger Shroff) अशा काही बॉलिवूड कलाकारांपैकी एक आहे जे त्याच्या कामावर लक्ष केंद्रित करतात आणि क्वचितच चर्चेत असतात. बहुतेक वेळा तो त्याच्या फिटनेस, खेळ इत्यादींवर लक्ष केंद्रित करतो आणि चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी असतो. यामुळे तो बॉलीवूडमध्ये (Bollywood) सर्वांच्या प्रिय आहे. वडील जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) यांच्या व्यक्तिमत्त्वापेक्षा पूर्णपणे वेगळा असलेला टायगर श्रॉफ आज त्याचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे चाहते त्याला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

हेमंत झाला टायगर

टायगर श्रॉफचा जन्म 2 मार्च 1990 रोजी झाला. टायगर श्रॉफ त्याचे वडील जॅकी श्रॉफ यांचा खूप लाडका आहे. त्याचे खरे नाव टायगर नसून हेमंत श्रॉफ आहे. हे गुढ त्याच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. खरे तर त्याचे वडील जॅकी श्रॉफ लहानपणापासून त्याला प्रेमाने टायगर म्हणायचे आणि जेव्हा त्याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याने आपले नाव हेमंत बदलून टायगर श्रॉफ ठेवले. आता जग त्याला टायगर श्रॉफ याच नावाने ओळखते.

Tiger Shroff
'कच्चा बादाम' फेम गायकाचा अपघात; प्रकृती चिंताजनक

हिरोपंतीमध्ये दाखवली हिरोगिरी

साजिद नाडियाडवाला यांनी टायगर श्रॉफला त्यांच्या 'हिरोपंती' चित्रपटासाठी लॉन्च केले. त्याने 2014 पासून बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली. टायगर श्रॉफने पहिल्याच चित्रपटात आपल्या अभिनयाची कमाल दाखवून दिली.

एवढेच नव्हे तर त्याच्या डान्स आणि तंदुरुस्त बॉडीवर विशेषत: मुली जास्त फिदा आहेत. पण पहिल्याच चित्रपटानंतर लोकांनी खूप ट्रोलही केले. कोणी टायगर श्रॉफच्या गुलाबी ओठांची खिल्ली उडवली तर कोणी त्याला गर्ल लुक म्हणाले. मात्र दुसऱ्या चित्रपटानंतर टायगरने सर्वांची बोलती बंद केली.

तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट विजेता

टायगर श्रॉफ तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट विजेता आहे. तो मार्शल आर्ट्सचे ट्रेंड आहेत. अशा परिस्थितीत जेव्हा टायगर श्रॉफने त्याच्या दुसऱ्या चित्रपट 'बागी'मध्ये दमदार अ‍ॅक्शन केली तेव्हा लोक त्याच्याकडे बघतच राहिले. त्याचा 'बागी' हा चित्रपट जबरदस्त हिट ठरला आणि टायगर श्रॉफनेही ट्रोलर्सची बोलती बंद केली. आजच्या तारखेत, टायगर श्रॉफ अॅक्शन स्टार हिरो आहे. यानंतर तो 'बागी 2', 'स्टुडंट ऑफ द इयर 2', 'वॉर' 'बागी 3'सह अनेक चित्रपटांमध्ये दिसला. वॉर हा त्याचा आतापर्यंतचा सर्वात हिट चित्रपट आहे. यामध्ये तो हृतिक रोशनसोबत झळकला.

Tiger Shroff
Pregnancy Photoshoot: या बॉलिवूड अभिनेत्रींनी प्रेग्नेंसीमध्ये केला बेबी बंप फोटोशूट

पर्सनल लाईफ देखील चर्चेचा विषय आहे

टायगर श्रॉफ त्याच्या पर्सनल लाईफ आणि लव्ह लाईफमुळे देखील चर्चेत असतो. दिशा पटानीसोबत त्याचे नाव बऱ्याच दिवसांपासून जोडले जात आहे. मात्र, या दोघांनी कधीही आपले नाते अधिकृत केले नाही आणि नाकारलेही नाही. सध्या टायगर श्रॉफ त्याच्या आगामी प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करत आहे ज्यात अक्षय कुमारसोबत 'हिरोपंती 2', 'गणपत' आणि 'बडे मियाँ छोटे मियाँ है' या चित्रपटांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com