Amitabh Bachchan in Court : 'बीग बीं'चा आवाज वापराल तर खबरदार! दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Amitabh Bachchan in Court : बॉलीवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून अनेक कंपन्या त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचे नाव, आवाज आणि व्यक्तिमत्त्व वापरत असल्याचा आरोप केला आहे.
Amitabh Bachchan in Court
Amitabh Bachchan in CourtDainik Gomantak
Published on
Updated on

Amitabh Bachchan in Court : बॉलीवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून अनेक कंपन्या त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचे नाव, आवाज आणि व्यक्तिमत्त्व वापरत असल्याचा आरोप केला आहे. ही घटना खूप दिवसांपासून घडत आहे. ते प्रसिद्धी आणि व्यक्तिमत्त्वाचे हक्क त्यांना त्यांच्या पक्षात हवे आहेत. प्रसिद्ध व्यक्तिमत्व असल्याने, अमिताभ बच्चन यांना त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही त्यांची ओळख वापरू नये असे वाटते. (Amitabh Bachchan in Court)

Amitabh Bachchan in Court
53rd IFFI 2022: कांतारा स्टार ऋषभ शेट्टीची झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक...

या प्रकरणात अमिताभ बच्चन यांना दिलासा मिळाला आहे. न्यायमूर्ती चावला यांनी प्राधिकरण आणि दूरसंचार विभागाला अमिताभ बच्चन यांचे नाव, फोटो आणि व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये तात्काळ काढून टाकण्याचे आदेश जारी केले आहेत जे सार्वजनिकरित्या वापरले जात आहेत. याशिवाय बच्चन यांच्या नावाचा आणि आवाजाचा बेकायदेशीर वापर करणाऱ्या फोन नंबरची माहिती देण्यास कोर्टाने दूरसंचार सेवा प्रदात्यांना सांगितले आहे. याशिवाय इंटरनेट सेवा पुरवठादारांना बच्चन यांच्या व्यक्तिमत्त्वाचे हक्क खराब करणाऱ्या ऑनलाईन लिंक्स काढून टाकण्यासही सांगण्यात आले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

वास्तविक, काही कंपन्या, अमिताभ बच्चन यांचे नाव, आवाज आणि व्यक्तिमत्त्वाचा चुकीच्या पद्धतीने वापर करत आहेत. जे हे करत आहेत ते चुकीचे असल्याचे अमिताभ यांनी याचिकेत म्हटले आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अमिताभ बच्चन यांच्या नावाने एक लॉटरीची जाहिरातही चालू आहे, जिथे त्यांचा फोटो प्रमोशनल बॅनरवर प्रदर्शित झाला आहे. याशिवाय त्यावर KBC चा लोगोही आहे. हे बॅनर लोकांची दिशाभूल करण्यासाठी कोणीतरी तयार केले आहे. यात अजिबात तथ्य नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com