Amitabh Bachchan
Amitabh BachchanDainik Gomantak

Amitabh Bachchan: पॅरिसच्या सलूनमध्ये पोहोचली बीग बींची हेअरस्टाईल

पॅरिसमध्ये अमिताभ बच्चन यांच्या हेअरस्टाईलला पसंती दर्शवली जात आहे.
Published on

पॅरिसमध्ये (Paris) अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांच्या हेअरस्टाईलला पसंती दर्शवली जात आहे. अमिताभ बच्चन यांना चित्रपटसृष्टीत जवळपास पाच दशके झाली आहेत तसेच बीग बी हे केवळ भारतातच नाही तर जगभरात खूप लोकप्रिय अभिनेते आहेत. (Amitabh Bachchan hairstyle hits Paris salons)

बीग बी यांची हेअरस्टाईल अनेकजण कॉपी करत असतात. त्यांच्या हेअरस्टाइलची ख्याती परदेशात पोहोचली आहे. बीग बी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पॅरिसमधील एका सलूनचा फोटो देखील शेअर केला आहे.

या फोटोसोबत त्यांनी लिहिले की, 'कोणीतरी पॅरिसमध्ये होते, आणि त्याच्याकडून हे सरप्राईज मिळाले आहे. त्याने सलून पाहिले, तिथे माझा फोटो होता. अरे देवा, जगाचे काय चालले आहे.

'अमिताभ बच्चन लवकरच रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत 'ब्रह्मास्त्र' चित्रपटामध्ये दिसून येणार आहेत. या चित्रपटात बीग बी ब्रह्मास्त्राच्या रक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच हा चित्रपट 09 सप्टेंबर 2022 रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com