Alia Bhatt- Ranbir Kapoor Baby: बॉलिवूडमधील चाहत्यांचे सर्वात लाडके कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे आई-वडील झाले आहेत. मुंबईतील KHN रिलायन्स रुग्णालयात आलियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. यानंतर संपूर्ण कपूर कुटुंबात जल्लोषाचे वातावरण आहे. प्रत्येकजण आलियाला आई झाल्याबद्दल शुभेच्छा देताना दिसत आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर चाहते आलियाला अनेक शुभेच्छाही देत आहेत
आलिया-रणबीर या वर्षी लग्नबंधनात अडकले
आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर याचवर्षी 14 एप्रिलला लग्नबंधनात अडकले. दोघांचे लग्न अगदी साधेपणाने त्यांच्या घरी झाले. आलिया आणि रणबीरनं लग्नाआधी एकमेकांना पाच वर्ष डेट केले. आलियानं काही महिन्यांपूर्वी एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला होता. या फोटोमध्ये आलिया आणि रणबीर दिसत आहेत. हा फोटो शेअर करुन आलियानं त्याला, 'आमचं बाळ लवकरच येत आहे', असं कॅप्शन दिलं.
आलिया घेणार ब्रेक
बाळाच्या जन्मानंतर आलिया भट्ट एका वर्षाचा ब्रेक घेणार आहे. आलिया भट्टने मॅटरनिटी लीव्हवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. बाळासोबत जास्तीत जास्त वेळ घालवता यावा यासाठी आलियाने हा निर्णय घेतला आहे. ब्रेकवर जाण्यासाठी आलियाने आगामी सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. काही दिवसांपूर्वी आलिया आणि रणबीरचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.