happy birthday alok nath
happy birthday alok nathDainik Gomantak

Alok Nath B'Day: ‘या’ चित्रपटामुळे आलोक नाथना मिळाला ‘संस्कारी बाबूजी’ ची ओळख

Alok Nath: बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये संस्कारी बाबूजींची भुमिका साकारणारे आलोक नाथ यांचा आज वाढदिवस आहे.
Published on

बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये संस्कारी बाबूजींची भुमिका साकारणारे आलोक नाथ (Alok Nath) यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका साकारल्या आहेत. आपल्या अभिनयाने त्यांनी अनेक पात्रांना पडद्यावर अक्षरशः जिवंत केले. आलोक नाथ यांचा जन्म बिहारच्या खगाडीया जिल्ह्यात झाला होता. बॉलिवूडमध्ये आपल्या भुमिकेने सर्वांचे मन जिंकले आहे. (Alok Nath B'Day News)

आलोक नाथ यांचा जन्म एका अशा कुटुंबात झाला होता, ज्यांना चित्रपटाबद्दल कोणतीही आवड नव्हती. कॉलेजमध्ये असताना त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. इथे त्यांनी 3 वर्ष अभिनयाचे शिक्षण घेतले. दूरदर्शनच्या ‘रिश्ते नाते’ या मालिकेमधून त्यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती.

‘संस्कारी बाबूजी’ टॅग!

1982 मध्ये त्यांनी 'गांधी' (Gandhi) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पन केले. या चित्रपटात आलोक नाथ यांची भूमिका छोटी होती. वयाच्या 32व्या वर्षी त्यांनी ‘कयामत से कयामत’ या चित्रपटात वडिलांची (Movie) भूमिका साकारली होती. यात चित्रपटात त्यांनी सिंगल फादरची भूमिका साकारली होती. ही भूमिका अनेकांच्या हृदयाला स्पर्श करून गेली. या चित्रपटापासून त्यांना अशाच प्रकारच्या भूमिका अधिक ऑफर होऊ लागल्या. यामुळेच बॉलिवूडमध्ये त्यांची इमेज ‘संस्कारी बाबूजी’ अशी झाली.

happy birthday alok nath
Payal Sangram Wedding Photo: लॉक अप फेम पायल रोहतगी अन् संग्राम सिंह यांचा शाही विवाहसोहळा

आता बॉलिवूडमध्ये त्यांची ओळख ‘संस्कारी बाबूजी’ असलं तरी त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत रोमँटिक हिरो म्हणूनही काम केले आहे. आलोक नाथ यांनी 1987मध्ये आलेल्या 'कामाग्नी' चित्रपटात खूप बोल्ड सीन्स दिले होते. याशिवाय त्यांनी काही चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिकाही साकारली आहेत.

'हम साथ-साथ हैं', 'हम आपके है कौन', 'परदेस', 'मैने प्यार किया', 'विवाह' यांसारखे चित्रपट, तर 'सपना बाबुल का बिदाई','मैं रहने वाली महलों की','यहां मैं घर-घर खेली','बुनियाद' यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी वडिलांच्या भूमिका साकारल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com