Ali Baba Set Fire: ज्या सेटवर तुनिषा शर्माने आत्महत्या केली होती तो....

तुनिषा शर्माने अली बाबा या सिरीयलच्या सेटवर आत्महत्या केली होती तो आता आगीच्या भक्ष्यस्थानी गेला आहे...
Ali Baba Set Fire
Ali Baba Set FireDainik Gomantak

अभिनेत्री तुनिषा शर्माने अली बाबा या टिव्ही सिरीयलच्या सेटवर आत्महत्या केली होती. त्यानंतर बराच काळ तिची आत्महत्या वेगवेगळ्या वादात अडकली होती. या प्रकरणात अभिनेता शीजान खानला मुख्य आरोपी म्हणुन अटक करण्यात आली होती.

पाच महिन्यांपूर्वी या बातमीने सर्वांचीच झोप उडवली ती म्हणजे, . 'अलिबाबा: दास्तान ए कबूल' या मालिकेच्या सेटवरच तुनिषाने गळफास लावून घेतला. त्यानंतर ही मालिका, त्यातले कलाकार, तुनिषाचे प्रेम प्रकरण अशा बऱ्याच चर्चा झाल्या.

आता पुन्हा एकदा 'अलिबाबा: दास्तान ए कबूल' ही मालिका चर्चेत आली आहे. कारण या मालिकेच्या सेटवर मोठी दुर्घटना घडली आहे. ज्या सेटवर तुनिषाने २४ डिसेंबरला गळफास घेत आत्महत्या केली होती. तो सेट एका भीषण आगीत सेट जळून खाक झाला आहे. शनिवारी या सेटवर अचानक आग लागली, ज्यामध्ये संपूर्ण सेट जळून उद्ध्वस्त झाला आहे.

तुनिषाची आत्महत्या म्हणजे लव जिहाद आहे का अशीही चर्चा सोशल मिडियावर झाली होती पण त्यानंतर असं बोलणाऱ्यांविरोधात टिकाही झाली होती. साहजिकच या मुद्द्याला विरोध झाला शीजान आणि तुनिषा शर्माच्या व्हॉट्सअप चॅटचीही चर्चा झाली होती.

या आत्महत्या प्रकरणाने अभिनेत्रींच्या सुरक्षिततेचाही प्रश्न समोर आला होता. तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणाने टेलिव्हिजन विश्वात मोठीच खळबळ उडाली होती.

Ali Baba Set Fire
Sheezan Khan got Bail :"तुनिषा असती तर ती माझ्यासाठी खूप"...तुरूंगात बाहेर पडताच शीजान बोलला...

यानंतर जेव्हा शीजान खान जामीनावर बाहेर आला तेव्हा त माध्यमांशी खास बोलताना शीझान म्हणाला होता, “आज मला स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजला आहे आणि मी ते अनुभवू शकतो. जेव्हा मी माझ्या आई आणि बहिणींना पाहिले तेव्हा मला अश्रू अनावर झाले आणि त्यांच्यासोबत परत आल्याने मला खूप आनंद झाला.

शीझान म्हणाला होता, “शेवटी, मी माझ्या कुटुंबासोबत आहे! ही एक जबरदस्त भावना आहे. मला फक्त काही दिवस माझ्या आईच्या कुशीत झोपायचे आहे, तिच्या हातचे जेवायचं आहे आणि माझ्या बहिणी आणि भावासोबत वेळ घालवायचा आहे.”

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com