Mangalavaram Teaser : गावात घडलेल्या या गोष्टीत नेमकं काय रहस्य दडलंय?

मंगलावरम या चित्रपटाचा टिजर नुकताच रिलीज झाला आहे, या चित्रपटात एका गावाची गोष्ट सांगितली आहे,ज्यात अनेक रहस्य दडली आहेत.
Mangalavaram Teaser
Mangalavaram TeaserDainik Gomantak
Published on
Updated on

तेलगू चित्रपट RX 100 च्या यशानंतर, दिग्दर्शक अजय भूपती त्याच्या पुढच्या चित्रपटासह परतला आहे. त्याचा आगामी चित्रपट मंगलावरम (हिंदीमध्ये मंगलवार) चा टीझर निर्मात्यांनी रिलीज केला. चला पाहुया हा टिजर चित्रपटाविषयी नेमकं काय सांगतोय.

टिजरही रहस्यमयी

मंगलवारमचा टीझर साऊंड आणि इमेजेसचं एक भन्नाट जग दाखवतो. या चित्रपटाची गोष्ट रहस्यमयी आहे. या गावातील अनेक रहिवासी त्यांना ऐकू येणाऱ्या विशिष्ट आवाजाचा आणि व्यक्तीचा अर्थ उलगडण्याचा प्रयत्न करतात. टीझरमध्ये त्या व्यक्तीची ओळख उघड केलेली नाही, फक्त एक लहान मुलगा एका गडद गल्लीतून बाहेर पडताना पाहतो. तेव्हा एक माणूस त्याच्याभोवती आग घेऊन फिरताना दिसतो.

क्लोजअप शॉट्स भितीदायक वाटतात

धक्कादायक भाव असलेल्या लोकांचे बरेच क्लोज-अप शॉट्स दिसतात आणि ते भीतीदायक वाटत राहतात. टिजरमध्ये जेव्हा एका व्यक्तीला विचारले की त्याने काय पाहिले? तेव्हा ती व्यक्ती त्याला शांत राहण्यास आणि लक्ष देण्यास सांगते, कारण त्याच्या सभोवतालचे बरेच लोक काहीतरी शोधण्यासाठी वरच्या दिशेने पाहतात. काहीतरी भयंकर घडण्याची चाहुल या टिजरमधुन दिसते आणि ही भयंकर जाणीव टिजर पाहताना जाणवत राहते.

Mangalavaram Teaser
Deepika Padukone : दिपीकाचा प्रोजेक्ट के चा फर्स्ट लूक रिलीज मध्यरात्रीच मेकर्सनी दिलं सरप्राईज

पायल राजपूतची भूमीका

मंगलवारमच्या टीझरमध्ये मूर्तीच्या चेहऱ्याचा मुखवटा वापरणाऱ्या आणि इतर लोकांपासून लपणाऱ्या माणसाला पूर्ण दाखवण्यात आले नाही त्यामुळे चित्रपटाची उत्सुकता आणखी ताणवली जाते . RX 100 मध्ये मुख्य भूमिका असलेली अभिनेत्री पायल राजपूत देखील दिसते कारण ती मास्कच्या मागे लपलेल्या एका व्यक्तीच्या फ्लॅशबॅकने घाबरते. कांतारा फेम अजनीश लोकनाथ यांच्या थरारक बॅकग्राऊंड स्कोअरसह टीझर संपतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com