लग्नाचं ठिकाण ठरलं! रणबीर कपूर-आलिया भट्ट घेणार सप्तपदी

लवकरच हे दोघं लग्नाच्या बेडीत अडकणार असून या दोघांच्या लग्नाचं ठिकाणी देखील ठरलं आहे.
Alia Ranbir Wedding
Alia Ranbir WeddingDainik Gomantak
Published on
Updated on

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाच्या चर्चांना मागच्या काही दिवसांपासून उधाण आले आहे. चाहत्यांमध्ये दोघांच्या लग्नाबाबत कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. रणबीर आणि आलिया यांनी याबाबत अद्याप मौन बाळगलं असलं तरीही या दोघांच्या लग्नाबाबत महत्त्वाचे काही समोर आले आहे. लवकरच हे दोघं लग्नाच्या बेडीत अडकणार असून या दोघांच्या लग्नाचं ठिकाणी देखील ठरलं आहे. मात्र या दोघांचा विवाहसोहळा हा खासगी स्वरुपाचा असणार असल्याचे म्हटले जात आहे. ज्यात केवळ जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवारच उपस्थित राहणार आहेत. (Soon Ranbir Kapoor and Alia Bhatt will tie the knot)

Alia Ranbir Wedding
Malaika Arora : मलायका अरोराच्या तब्येतीत सुधारणा, रुग्णालयातून दिला डिस्चार्ज

बॉलिवूडमध्ये सध्या डेस्टिनेशन वेडिंगचा ट्रेंड आहे मात्र ‘पिंकव्हिला’नं दिलेल्या वृत्तानुसार आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या चर्चित जोडीचं लग्न मात्र मुंबईमध्येच पार पडणार आहे. तर लग्नासाठी त्यांनी कोणतंही फाइव्ह स्टार हॉटेल बुक केलेलं नाही. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी जेव्हा एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता त्याचवेळी त्यांनी लग्नाचं ठिकाणही ठरवलं होतं असं सांगण्यात येत आहे.

रणबीर आणि आलिया मुंबईतील कोणत्याही फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये नाही तर कपूर कुटुंबीयांच्या प्रसिद्ध ‘आरके हाऊस’मध्ये सप्तपदी घेणार असल्याचे म्हटलं जात आहे. लग्नाचं जे ठिकाण आहे ते रणबीरनं स्वतः ठरवलं आहे. रणबीर कपूर आणि त्याची आजी कृष्णा राज कपूर यांचं खूप चांगलं बॉन्डिंग होतं, त्याचे आई- वडील ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचं लग्नही 20 जानेवारी 1980 रोजी याच आरके हाऊसमध्ये झालं होतं. आणि त्यामुळे हे घर रणबीरसाठी खूप खास आहे आणि म्हणूनच त्यानं आरके हाऊसमध्ये आलियाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Alia Ranbir Wedding
Hrithik Roshan: ह्रतिकने 'विक्रम वेधा' मधील शेअर केला लूक

आलिया आणि रणबीर यांच्या लग्नासाठी 450 पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं असून या लग्नाची सर्व जबाबदारी ‘स्क्वाड वेडिंग प्लॅनर्स’ यांना देण्यात आली आहे. रणबीर आणि आलिया याच महिन्यात म्हणजे एप्रिल मध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. मात्र लग्नाची तारीख अद्याप समजलेली नाहीये. तसेच कपूर कुटुंबीयांनीही ही तारीख बाहेर कोणालाही समजणार नाही याची पूर्ण काळजी घेतली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com