'द काश्मीर फाईल्स'नंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'लंडन फाईल्स'; टीझर रिलीज

ओटीटी प्लॅटफॉर्म (OTT platform) वूट सिलेक्टवर रिलीज होणाऱ्या या वेब सीरिजमध्ये अनेक गहिरे रहस्यही उलगडले जातील. या मालिकेचा टीझर रिलीज झाला आहे.
London Files
London FilesDainik Gomantak
Published on
Updated on

London Files : 1990 मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचार आणि नरसंहारावर आधारित 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाने देशाला हादरवून सोडले. या चित्रपटाने आपल्या बजेटपेक्षा कितीतरी पटीने अधिक कमाई केली आहे, अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे'ही त्याच्यासमोर टिकू शकला नाही.

आता 'द कश्मीर फाईल्स'ची जादू कमी होत असली तरी या चित्रपटानंतर आता 'लंडन फाईल्स'ची चर्चा रंगली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म (OTT platform) वूट सिलेक्टवर रिलीज होणाऱ्या या वेब सीरिजमध्ये अनेक गहिरे रहस्यही उलगडले जातील. या मालिकेचा टीझर रिलीज झाला आहे.

London Files
मलायका अरोरासोबत हरनाज संधूने धरला 'छैय्या छैय्या' गाण्यावर ठेका; व्हिडिओ पहा

'लंडन फाईल्स'मध्ये (London Files) अभिनेता अर्जुन रामपाल मुख्य भूमिकेत दिसणार असून पूरब कोहली सहाय्यक भूमिकेत दिसणार आहे. या वेब सिरीजचा टीझर (Teaser) आज रिलीज करण्यात आला, जो सोशल मीडियावर मोठ्या संख्येने लोक पाहत आहेत.

लंडन फाईल्समध्ये अर्जुन रामपाल एका गुप्तहेराची भूमिका करतो जो अमरच्या हरवलेल्या मुलीचे गूढ उलघडतो. त्याचवेळी पूरब कोहली 'अमर' नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे, ज्याच्यावर संशयाची सुई सर्वाधिक असते. वेब सीरिजमध्ये अशी अनेक रहस्ये आहेत, ज्यामुळे अर्जुन रामपालच्या अनेक अडचणी वाढतात.

ओमच्या भूमिकेत अर्जुन रामपालला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. अर्जुनने इंस्टाग्राम हँडलवर 'लंडन फाईल्स'वर पोस्ट केली आहे. आतापर्यंत या पोस्टला हजारो लोकांनी लाईक केले आहे. सपना पब्बी, मेधा राणा, गोपाल दत्त, सागर आर्य आणि इवा जेन विलिस हे या वेब सीरिजमध्ये भूमिकेत दिसणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com