मलायका अरोरासोबत हरनाज संधूने धरला 'छैय्या छैय्या' गाण्यावर ठेका; व्हिडिओ पहा

हरनाज आणि मलायकाच्या या व्हिडिओने चाहत्यांमध्ये चांगलीच भुरळ घातली आहे.
Malaika Arora and Harnaaz Sandhu Dance
Malaika Arora and Harnaaz Sandhu DanceDainik Gomantak

Malaika Arora and Harnaaz Sandhu Dance : मिस युनिव्हर्स हरनाज संधू सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हरनाज संधूच्या चाहत्यांसाठी ही बातमी आनंददायी ठरणार आहे. कारण ब्युटी क्वीन हरनाज एव्हरग्रीन 'छैय्या छैय्या' या गाण्यावर थिरकताना दिसेल. हरनाज संधूचा हा डान्सिंग व्हिडिओ व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे छैय्या छैय्या गाण्याची मूळ कलाकार मलायका अरोरा व्हिडिओमध्ये हरनाज संधूला डान्स शिकवत आहे. (Harnaz Sandhu dance with Malaika Arora on 'Chaiyya Chaiyya' song)

Malaika Arora and Harnaaz Sandhu Dance
व्हॉट्सअपने बॅन केली 14 लाखांहून अधिक खाती, कारण समोर आले

हरनाज मलायकाच्या (Malaika Arora) डान्स स्टेप्सशी जुळवून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसत आहे. दोन सौंदर्यवतींना एकाच मंचावर पाहणे चाहत्यांसाठी एखाद्या ट्रीटपेक्षा कमी नाही. हरनाज (Harnaaz Sandhu) आणि मलायकाच्या या व्हिडिओने चाहत्यांमध्ये चांगलीच भुरळ घातली आहे.

मलायका अरोरा आणि हरनाज संधूने डान्स केल्यानंतर एकमेकांना मिठी मारली. मलायका अरोरा ब्लॅक बॉडी फिट लाँग ड्रेसमध्ये नेहमीप्रमाणेच आकर्षक आणि ग्लॅमरस दिसत होती. त्याच वेळी, हरनाज देखील कमी आकर्षक दिसत नाही.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, जिथे अनेक लोक हरनाज आणि मलायकाच्या बाँडची प्रशंसा करताना दिसले, तिथे काही लोकांनी हरनाजला बॉडी शेमही केले. हल्ली लोक हरनाजला तिच्या वाढलेल्या वजनामुळे खूप ट्रोल करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com