Preity Zinta: तुमचा दयाळूपणा अन्... प्रिती झिंटाने सासऱ्यांना अशी वाहिली श्रद्धांजली, एक स्पेशल नोटही लिहिली

अभिनेत्री प्रिती झिंटाने तिचे सासरे दिवंगत जॉन स्विंडन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Preity Zinta:
Preity Zinta:Dainik Gomantak
Published on
Updated on

अभिनेत्री प्रिती झिंटाने तिच्या सासऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक स्पेशल नोट लिहिली आहे. या नोटमध्ये प्रिती चांगलीच भावुक झालेली दिसली.

प्रिती झिंटाने जीन गुडइनफसोबत लग्न केले आहे. तिने आता जीनचे वडील जॉन स्विंडल यांना श्रद्धांजली वाहणारी एक नवीन पोस्ट शेअर केली आहे.

प्रिती झिंटाने वाहिली श्रद्धांजली

अभिनेत्री प्रीती झिंटाने तिचे दिवंगत सासरे जॉन स्विंडल यांना श्रद्धांजली वाहणारी एक भावनिक नोट लिहिली. रविवारी (27 ऑगस्ट) इंस्टाग्रामवर प्रितीने स्वतःचा आणि तिचे सासरे जॉन यांचा एक थ्रोबॅक फोटो देखील पोस्ट केला.

प्रिती झाली भावुक

फोटो शेअर करताना, प्रितीने पोस्टला कॅप्शन दिले, "प्रिय जॉन, मला तुमची माझ्याबद्दलची तळमळ, तुमचा दयाळूपणा आणि तुमची अविश्वसनीय विनोदबुद्धी आठवेल.

मला तुमच्यासोबत शूटिंग करायला जायचे, तुमचे आवडते भारतीय पदार्थ बनवायला आणि प्रत्येक विषयावर संभाषण करायला मला आवडले.

तुमचे घर आणि तुमचे हृदय माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खुले केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार."

प्रिती पुढे लिहिते...

प्रितीने पुढे लिहिले की, "तुमच्याशिवाय ईस्ट कोस्ट आधिसारखा राहणार नाही. मला माहित आहे की तुम्हा सध्या शांततेत आहात आणि आनंदी ठिकाणी आहात. शांततेत आराम करा (ब्रोकन हार्ट इमोजी). 

तिने हॅशटॅग देखील जोडले – RIP, RIP जॉन स्विंडल, सासरे आणि ओम शांती. या पोस्टवर प्रतिक्रिया देताना सुझान खान म्हणाली, "तुम्हाला आणि जीनला खूप मोठं नुकसान झालंय याबद्दल वाईट वाटतं... त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो."

Preity Zinta:
Oh My God 2 Collection : अखेर अक्षयच्या 'ओ माय गॉड'नेही पार केला 100 कोटींचा आकडा....

सेलिना जेटली म्हणाली

सेलिना जेटलीने लिहिले, "तुम्हाला आणि जीनला माझ्या मनापासून संवेदना. किती सुंदर फोटो खूप प्रेम व्यक्त करतात." एका चाहत्याने कमेंट केली, "माफ करा, त्याच्या आत्म्याला शांती लाभो. माझा सर्वांप्रती शोक आहे." 

एका युजरने असंही लिहिलं "आमच्या प्रार्थना आणि संवेदना श्रीमती गुडनफ तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी,"

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com