Kajol's Instagram Post
Kajol's Instagram PostDainik Gomantak

Kajol's Instagram Post: "अपेक्षा आणि वास्तव या मध्ये फरक असतो! " काजोलच्या या कॅप्शनचा अर्थ काय?

अभिनेत्री काजोलने नुकतीच इन्स्टाग्रामवर आपल्या फोटोसोबत एक कॅप्शन लिहिली आहे, काय आहे त्याचा अर्थ...
Published on

Kajol's Instagram Post: बॉलीवूड सेलिब्रिटी सोशल मिडीयावर बरेच अ‍ॅक्टिव्ह असतात, आपल्या फॅन्सपर्यंत पोहोचण्यासाठी सेलिब्रिटीजना सोशल मिडीयाचं माध्यम अतीशय प्रभावी वाटतो.

बऱ्याचदा आपला एखादा विचार किंवा एखाद्या गोष्टीवरचं मतही सेलिब्रिटीज सोशल मिडीयाच्या माध्यमातून मांडत असतात ;आणि त्याची चर्चाही होत असते आता सध्या अभिनेत्री काजोल इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.

बॉलीवूड अभिनेत्री काजोलने अलीकडेच अपेक्षा आणि परिस्थितीचे वास्तव यातील फरक सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तिने अनेक फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना तिची झलक दिली. हलक्याफुलक्या पद्धतीने, तिने अपेक्षा आणि वास्तव यांच्यातील तफावत विनोदीपणे अधोरेखित केली.

काजोलची ती कॅप्शन आणि चाहते खुश

बुधवारी, काजोलने तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दोन सुंदर फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना खुश केले आहे. पहिल्या फोटोत तिला शोल्डर ऑफ शोल्डर ब्लॅक ड्रेसमध्ये शोकेस केले गेले होते ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

तिच्या या स्टाईलने आणि स्वीट लूकने, तिने सहजतेने तिच्या फॅन्सचे लक्ष वेधून घेतले आणि त्यांना तिच्या सौंदर्याने आणि स्टाईलने चकित केले आहे.

  काजोलन दुसर्‍या एका फोटोत ट्विस्ट दिला, जो आधीच्या फोटोद्वारे सेट केलेल्या ग्लॅमरसला धक्का देतो .या फोटोत, काजोलने तोच आकर्षक ऑफ-शोल्डर गाउन परिधान केलेला दिसतो परंतु तिच्या ड्रेसभोवतीच्या टिशूकडे जास्त लक्ष जातं. फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “Expectation VS Reality.” म्हणजेच अपेक्षा विरुद्ध वास्तव.

सोशल मिडीयावर काजोलची धमाल

ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने, काजोलच्या फॅन्सनी रोजच्या जगण्यात विनोद शोधण्याची तिच्या या अनोख्या क्षमतेचं कौतुकच केलं आहे . यावेळी फॅन्सनी विनोदी , कौतुक करणाऱ्या आणि लाडक्या काजोलवर प्रेम व्यक्त करणाऱ्या कमेंट्सनी कमेंट्स सेक्शन भरुन टाकला आहे.

 या फोटोंवर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने कमेंट केली, “काजोल या शब्दासारखी अजूनही सर्वात सुंदर स्त्री आहेस, तुझे डोळे अजूनही आकाशातील तार्‍यांसारखे चमकतात, तुझे स्मित अजूनही आश्चर्यकारक आहे, मग या पृथ्वीवरील प्रत्येक ठिकाणी मी तुझ्यावर प्रेम करतो सर्व माणसांसारखे. या जगात तुम्ही सर्वोत्कृष्ट आहात,” अशी कमेंट दुसऱ्या यूजरने लिहिले, तर आणखी एकाने “खरंच आश्चर्यकारक आहे, अशी कमेंट केली आहे.

Kajol's Instagram Post
R Madhavan Birthday: या कारणामुळे आर माधवनला 'अभिनेता' नाही, तर 'सैनिक' व्हायचं होतं

काजोलचे आगामी प्रोजेक्ट

दरम्यान, वर्क फ्रंटवर, 48 वर्षीय काजोल शेवटची  'सलाम वेंकी'मध्ये दिसली होती .रेवतीने दिग्दर्शित केलेल्या स्लाइस-ऑफ-लाइफ ड्रामा चित्रपटात विशाल जेठवा देखील मुख्य भूमिकेत होता.

 चित्रपटाचे कथानक एका आईच्या वास्तविक जीवनातील कथेभोवती फिरते जी तिचा मुलगा, ज्याला ड्यूचेन मस्क्यूलर डिस्ट्रॉफी या आजाराचे निदान झाले आहे, त्याच्या आयुष्याचा त्याने पुरेपूर आनंद लुटावा यासाठी खूप प्रयत्न करतात. द गुड वाईफ या लोकप्रिय अमेरिकन मालिकेचे हिंदी रूपांतर यांसह काजोल पुढच्या काळात बरीच बिझी दिसेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com