Actress Jacqueline Fernandez: चित्रपट अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशीसाठी ईडीच्या दिल्ली (ED Office, Delhi) कार्यालयात हजर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 200 कोटी रुपयांच्या खंडणी संबंधित प्रकरणात ईडी जॅकलिनची चौकशी (ED Inquiry) करणार आहे. याअगोदर, या प्रकरणी चौकशीसाठी तिला 16 ऑक्टोबर रोजी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश होते, मात्र वैयक्तिक कारणे देऊन जॅकलिनने उपस्थित राहण्यास असमर्थता दाखवली होती. त्यानंतर एजन्सीने तिला 18 ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश दिले असता ती हजर झाली नव्हती.
ईडीला कथित ठग सुकेश चंद्रशेखरविरोधात सुरू असलेल्या मनी लाँडरिंगच्या संदर्भात जॅकलिन फर्नांडिसकडे चौकशी करायाची आहे. या प्रकरणी जॅकलिन ऑगस्टमध्ये ईडीसमोर एकदा हजर झाली होती, आणि तिने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींनुसार तिने आपली जबानी नोंदवली होती.
आता ईडी जॅकलिनला ठग चंद्रशेखर व त्याची पत्नी अभिनेत्री लीना मारिया पॉल यांच्या समोर आणणार असल्याची माहिती मिळाली आहे. ईडी अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणी तपास यंत्रणेला पैशांचे व्यवहार समजून घ्यायचे आहेत, जे कथितपणे फर्नांडिसशी संबंधित आहेत.
चंद्रशेखर आणि पॉल यांना अलीकडेच ईडीने अटक करून स्थानिक कारागृहात ठेवले आहे. यापूर्वी दिल्ली पोलिसांनी या दोघांना 'फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रवर्तक शिविंदर मोहन सिंग यांची पत्नी अदितीसह काही हायप्रोफाईल लोकांना फसवल्याप्रकरणी' ताब्यात घेतले होते.
ऑगस्टमध्ये ईडीने चंद्रशेखरच्या मालमत्तेवर छापा टाकून चेन्नईतील एक बंगला, रोख रक्कम 82.5 लाख आणि १२ लक्झरी कार जप्त केल्या होत्या. त्यानी एका निवेदनात चंद्रशेखर हा "प्रचलित ठग" असल्याचा दावा केला होता. दिल्ली पोलिसांकडून कथित गुन्हेगारी कट, खंडणी आणि 200 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चंद्रशेखरची चौकशी केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.